सीबीएससीचे १७२४ विद्यार्थी परीक्षा न देताच झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:48+5:302021-04-20T04:36:48+5:30
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होती. बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान ...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होती. बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली. सीबीएससी बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे की, परीक्षाच रद्द केल्या आहे.
बॉक्स
पालक काय म्हणतात?
ज्याप्रकारे बारावीची परीक्षा होत आहे, त्याच प्रकारे दहावीची परीक्षा घ्यायला हवी होती; पण कोरोनाचा स्ट्रेन कमी झाल्यावरच. अगदी माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पुढे दहावीची परीक्षा रद्द करणे हा निर्णय मुलांसाठी योग्य वाटत नाही.
-बाबुलाल वासनिक, पालक
बॉक्स
गुणदान समपातळीवर कसे आणणार?
विद्यार्थ्यांचे गुणदान, निकाल कसा तयार केला जाणार यावर प्रश्नचिन्ह उभे झाले
होते. मात्र, सीबीएससी बोर्डामार्फतच गुणदान मूल्यांकन मापदंड तयार केले जाणार आहे.
त्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे.
बॉक्स
अकरावी आयटीआय प्रवेश कसे होणार?
मूल्यांकनाच्या मापदंडात आधारित सर्व विद्यार्थ्यांच्या सीबीएससीच्या दहावीचा निकाल
तयार केला जाईल. त्यानंतरच प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेश कसे होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर पालकांची देखील चिंता वाढली आहे.
कोट
ऑनलाइन एकच परीक्षा घ्यावी लागेल काय, ही बाब सीबीएससी बोर्डाचा अंतर्गत येते, त्यांनी ते नियोजन केले असेलच. त्याचप्रमाणे सर्व स्टेट बोर्ड आणि आपापल्या स्तरावर नियोजन केले आहे. अंतर्गत मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना गुणांकन होणार आहे. दोन दिवसांत त्यांची प्रणाली जाहीर होणार आहे. मात्र, ही मुले जेव्हा स्टेटला येतील, तेव्हा दुसऱ्या स्टेटच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशासाठी अडचण निर्माण होईल, आपल्याही राज्य सरकारने दहावीच्या बाबतीत निर्णय घ्यायला पाहिजे.
प्रशांत वाघाये, शिक्षण तज्ज्ञ.
सीबीएससीचे दहावीतील एकूण विद्यार्थी
८९० मुले
८३४ मुली