जिल्ह्यासाठी १७५.६१ कोटींची अतिरिक्त मागणी

By Admin | Published: March 7, 2017 12:28 AM2017-03-07T00:28:40+5:302017-03-07T00:28:40+5:30

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय ...

175.61 crore additional demand for the district | जिल्ह्यासाठी १७५.६१ कोटींची अतिरिक्त मागणी

जिल्ह्यासाठी १७५.६१ कोटींची अतिरिक्त मागणी

googlenewsNext

विभागीय आयुक्तांकडे बैठक : निधी उपलबध करुन देण्याचे अर्थमंत्र्याचे आश्वासन
भंडारा : वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठकीमध्ये सन २०१७-१८ करिता भंडारा जिल्ह्यासाठी १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली. सदर मागणीबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ.परिणय फुके, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, साकोलीचे आमदार बाळा काशीकर, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड तसेच प्रमुख यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी ७९ कोटी ४० लक्ष रूपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विविध यंत्रणांकडून १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रूपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०१७-१८ अंतर्गत १७५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार रूपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात येत असल्याचे सांगितले.
अतिरिक्त निधी वने व वन्यजीव, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, सामान्य शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगर विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, ऊर्जा, परिवहन आदी कामासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील चारही आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, भंडारा जिल्ह्यातून आलेली अतिरिक्त निधीची मागणी मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. जिल्हास्तरावर रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा बनविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नागपूर विभागातील मामा तलावासाठी मागील वर्षी १५० कोटी रुपये देण्यात आले. मात्र ती कामे वेगाने पूर्ण झाली नाही असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, मामा तलावाचे नूतणीकरण करताना मत्स्य संवर्धन हा मुख्य घटक माणण्यात यावा. मानव विकास मिशन अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या तालुक्याची आरोग्य शिक्षण व रोजगार या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. यासाठी लागणारा निधीचा आराखडा एप्रिलमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 175.61 crore additional demand for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.