मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:43 PM2018-01-09T23:43:51+5:302018-01-09T23:44:27+5:30
तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला.
इंद्रपाल कटकवार ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला. भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत १८ कर्करुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात ४ लक्ष ५१ हजार ८९३ नागरिकांचा यात सहभाग होता. जिल्ह्यातील ७५ हजार ६४५ नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतली.
तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत जाऊन ३ लक्ष ७६ हजार २४८ नागरिकांची तपासणी केली. यात ४८ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. शासनाने असंसर्गीय आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेतली होती. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नियोजन सुरु होते.
अशी आहे व्यसनाधीन व्यक्तींची संख्या
च्तपासणी अंतर्गत मद्यप्राशन करणारे ५९ हजार ९८८ लोकांची संख्या आहे. तसेच तंबाखू खाणारे १ लक्ष ६९ हजार ६३ व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. या अंतर्गत तंबाखू खाण्यामुळे तोंड न उघडता येणाºया व्यक्तींची संख्या ७ हजार ३५९, पांढरा लाल चट्टा असलेले १ हजार ७८०, जाडसर त्वचा असलेले ८०६ तर १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत चट्टा बरा न झालेल्या इसमांची संख्या ४६१ आहे. विशेष म्हणजे मुखाची स्वच्छता राखणाºया व्यक्तींची संख्या २ लक्ष ९५ हजार ६८८ असून अस्वच्छता ठेवणाºया व्यक्तींची संख्या १ लक्ष २२ हजार ३४६ आहे.
चार वर्षात वाढले रुग्ण
च्मागील चार वर्षात कर्करोगाने पीडित रुग्णांची संख्या १४ हून वाढून २३४ पर्यंत आली आहे. यात तोंडाच्या कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये १९ महिला तर ७९ पुरुषांचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये १४ कर्करुग्ण होते. सन २०१५ मध्ये ६५ तर २०१६ मध्ये ६२ कर्करुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण २०१७ मध्ये म्हणजेच ९३ इतके कर्करुग्ण आहेत. यात तोंडाचा कर्करुग्ण असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
तंबाखू सेवनापासून कर्करोग होतो, ही बाब माहित असतानाही सेवन करीत असलेल्या लोकांना या पासून परावृत्त करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने रुग्णालयात नि:शुल्क आरोग्य कर्करोग शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे.
-डॉ.मनिष बत्रा,
दंतरोग चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा.