तुमसर आणि मोहाडी तालुक्यात १८१ कोविड मार्गदर्शन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:18+5:302021-05-31T04:26:18+5:30

भंडारा : केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला सात वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा ...

181 Kovid guidance centers in Tumsar and Mohadi talukas | तुमसर आणि मोहाडी तालुक्यात १८१ कोविड मार्गदर्शन केंद्र

तुमसर आणि मोहाडी तालुक्यात १८१ कोविड मार्गदर्शन केंद्र

Next

भंडारा : केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला सात वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे भाजपच्यावतीने ठरविण्यात आले. याच पार्श्वभूमीमीवर भाजपच्यावतीने तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्रात एकाच दिवशी १८१ कोविड मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

कोविड या जागतिक महामारीचा प्रकोप पाहता, झालेले नुकसान हे फार मोठे भयंकर परिणामकारक होते. असे विध्वंसक परिणाम यापुढे होऊ नये याकरिता कोविड मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन माजी आमदार तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य चरण वाघमारे यांनी केले. पंतप्रधान मोदी शासनाच्या सप्तवर्षपूर्ती निमित्ताने तुमसर आणि मोहाडी तालुक्यात भाजपच्यावतीने सदर कोविड मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

कोविड महामारी सोबत लढतांना अनेक लढवय्ये मृत्युमुखी पडले. मागील वर्षीची पहिली आणि यावर्षीची दुसरी लाटेचा विध्वंस डोळ्यांनी पाहिला आहे. यावर उपाय म्हणून तुमसर आणि मोहाडी तालुक्यात कोरोना आजार प्राथमिक स्वरूपात योग्य सल्ला, योग्य उपचार दिल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्या रूग्णांना बेड, ऑक्सिजन, औषधी, वेंटिलेटर, बायापेप वा इतर अत्याधुनिक उपचाराकरिता लागणारी सेवाची माहिती या केंद्राद्वारे देण्यात येणार आहे.

मोहाडी तालुक्यातील ६५ गावात, मोहाडी, करडी, जांभोरा, निलज बु.देव्हाडा, नरसिंगटोला, नवेगाव खु., कान्हळगाव, बेटाळा, मंुढरी, बोरगाव, पालोरा, पांजरा, खडकी, ढिवरवाडा, रोहणा, रोहा, खमारी बु.पिंपळगाव, खुटसावरी, पारडी, मांडेसर, रामपुर, पाचगाव, नेरी, बिड, सातोना, पाहुणी, टाकळी, भोसा, वरठी, एकलारी, बोथली, दहेगाव, मोहगाव देवी, कांद्री, हिवरा, धुसाळा, काटी, जांब, शिवणी, सकरला, आंधळगाव, चिचोली, पालडोंगरी, पिंपळगाव, कान्हळगाव, अकोला, मलीदा, वडेगाव, सिरसोली, हरदोली, पांढराबोडी, सितेपार, सालेबर्डी, चिचखेडा, धोप, ताडगाव, सालई बु. उसर्रा, महालगाव, काटेबाम्हणी, सालई खु. डोंगरगाव, कुशारी,

तुमसर शहरातील, अकरा प्रभागांसह तुमसर तालुक्यातील १०५ गावांमध्ये सदर केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच संपुर्ण जिल्हयाभर अशी कोविड मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.

Web Title: 181 Kovid guidance centers in Tumsar and Mohadi talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.