१९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

By admin | Published: January 24, 2017 12:28 AM2017-01-24T00:28:51+5:302017-01-24T00:28:51+5:30

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

19 Benefits of Accident Insurance Scheme to Farmers | १९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

१९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

Next

९२ प्रकरणांचा समावेश : जनजागृतीचा फटका
इंद्रपाल कटकवार भंडारा
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. मात्र जनजागृती अभावी यावर्षी फक्त ९२ पैकी १९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे.
राज्यशासनाने मागील वर्षीपासून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली आहे. यात शेतकरी म्हणून महसुल कागदपत्रे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना तसेच वयोगट १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. मात्र याचा लाभ क्वचितच शेतकऱ्यांना मिळत असतो. यात रस्ता, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल व इतर अपघातात मृत्यू पावल्यास अथवा दोन डोळे, दोन्ही अवयव निकामी झाल्यास अथवा शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास २ लक्षपासून १ लाखांपर्यंत मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. जिल्ह्यात लहान सहान घटना शेतकऱ्यांसोबत घडत असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता, अपघात विमा योजनेची प्रस्तावांची संख्या लक्षात घेता मंजूर झालेली प्रकरणे अल्प आहेत. यासंदर्भात शासनाने जनजागृतीवर भर देवून शेतकऱ्यांना विमा योजनेबाबद जागृत करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रस्तावाला अंतिम रुप दिल्यानंतर धोरणानुसार एका खाजगी विमा कंपनीमार्फत लाभ दिला जातो.

ही योजना शेतकरी कुटूंबीयांसाठी अत्यंत फायद्याची आहे. शासनामार्फत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. शेतकरी केव्हाही या योजनेची माहिती जिल्हाअधीक्षक कृषी कार्यालय अथवा तालुका कृषी कार्यालयातून प्राप्त करु शकतात.
-डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा

Web Title: 19 Benefits of Accident Insurance Scheme to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.