तीन रेती घाटांवर १९ तास कारवाई; ३१३ ब्रास रेती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:28 PM2023-08-14T14:28:09+5:302023-08-14T14:28:52+5:30

महसूलचा पुढाकार : बेटाळा, रोहा व मोहगावदेवी घाट

19 hours operation on three sand ghats; 313 brass sand seized | तीन रेती घाटांवर १९ तास कारवाई; ३१३ ब्रास रेती जप्त

तीन रेती घाटांवर १९ तास कारवाई; ३१३ ब्रास रेती जप्त

googlenewsNext

मोहाडी (भंडारा) : बेटाळा, रोहा व मोहगावदेवी येथील रेती घाटांवर तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या पथकांनी धाड घातली. तहसीलदारांसह पथकातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून रेतीची व जप्ती विक्रीचा सोपस्कार केला. या धाडीत एकाच वेळी महसूल विभागाने ३१३ ब्रास रेती जप्तीची मोठी कारवाई केली.

रेती डंपिंग व रेतीची चोरी थांबता थांबेना. तुम्ही काहीही करा आम्ही रेती चोरी करणारच, अशी भूमिका रेती चोरांनी घेतली आहे. शनिवारी तहसीलदार सुरेश वाघचौरे व तलाठी पराग तितीरमारे, वसंत कांबळे, वैभव जाधव, कोतवाल आरिफ शेख, अरविंद चोपकर तसेच वाहन चालक कृष्णा भोयर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी बेटाळा, रोहा व मोहगावदेवी घाटावर धाड घातली त्यात बेटाळा घाटावरून ११३ ब्रास रेती, रोहा घाट ८२ ब्रास रेती व मोहगाव देवी घाटावरून ११८ ब्रास रेती जप्त केली.

जप्तीची कारवाई दुपारी १ वाजता करण्यात आली. रेतीची मोजणी करण्यात आली. जप्तीची कारवाई ४ वाजता सुरू होऊन सकाळी ८ वाजता संपली. एकूण ३१३ ब्रास रेतीचा साठा शासकीय कंत्राटदाराला जागेवरच विक्री करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांनी बंदोबस्तासाठी दोन पोलिस कॉन्स्टेबल यांचे पथक तैनात ठेवले होते.

Web Title: 19 hours operation on three sand ghats; 313 brass sand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.