रोहयो अंतर्गत १९ हजार ४७९ कुटुंबाना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:09+5:302021-06-19T04:24:09+5:30
गतवर्षी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण १९ हजार ४७९ कुटुंबांतील व्यक्तींद्वारा जवळपास ५.४ लाख मनुष्य दिवस ...
गतवर्षी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण १९ हजार ४७९ कुटुंबांतील व्यक्तींद्वारा जवळपास ५.४ लाख मनुष्य दिवस काम केले गेले आहे. त्या अंतर्गत शासनाद्वारे ९८३.४८ करोड रुपये मजुरी मजुरांना दिली आहे. शासनाच्या मग्रारोहयो योजनेअंतर्गत सन २०२० - २०२१ मध्ये तालुक्यातील ३६४.३३ कोटी रुपयांचे कुशल कामांची निर्मिती करण्यात आली. सदर कामांमध्ये गावातील सिमेंट रोड, स्वच्छतागृह, पाळीव प्राण्यांसाठी गोठे बांधकाम, सिंचन विहीर यांसह अन्य निर्माण कामांचा समावेश आहे.
एकूणच शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील पर्याप्त संख्येत कुशल व अकुशल काम केले जात असल्याने तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
बॉक्स
लाखांदूर पंचायत समिती जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी
शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत गत काही वर्षांपासून ग्रामीण भागात नियमितपणे करण्यात येत असलेल्या कुशल व अकुशल कामाअंतर्गत लाखांदूर पंचायत समिती जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ जी.पी. अगर्ते यांनी दिली आहे.