पायखुरीने २० जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 09:58 PM2019-02-14T21:58:15+5:302019-02-14T21:58:30+5:30

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात जनावरांना पायखुरीची लागण झाली असून मोहाडी (खापा) येथे २० जनावरांचा मृत्यू झाला. तर गावातील अनेक जनावरांना या आजाराने ग्रासले आहे. यामुळे गोपालक चांगलेच हादरले असून कोणताही प्रतिबंधक उपाय होत नसल्याने शेतकऱ्यात संताप दिसत आहे.

20 animal deaths by drift | पायखुरीने २० जनावरांचा मृत्यू

पायखुरीने २० जनावरांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसिहोरातील प्रकार : अनेक जनावरांना लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात जनावरांना पायखुरीची लागण झाली असून मोहाडी (खापा) येथे २० जनावरांचा मृत्यू झाला. तर गावातील अनेक जनावरांना या आजाराने ग्रासले आहे. यामुळे गोपालक चांगलेच हादरले असून कोणताही प्रतिबंधक उपाय होत नसल्याने शेतकऱ्यात संताप दिसत आहे.
मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सिहोरा परिसरात गत काही दिवसांपासून जनावरांना पायखुरीची (चपकाखुरी) लागण झाली आहे. महिनाभरापूर्वी सिंदपुरी गावात अचानक जनावरांना पायखुरीची लागण झाली. याबाबतची माहिती पशुचिकित्सा विभागाला देण्यात आली. गावात पशूवैद्यकीय यंत्रणेमार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात हा आजार रोखण्यात यश आले. परंतु या गावाशेजारी असणाºया मोहाडी खापा गावात गत काही दिवसांपासून पायखुरी आजाराने थैमान घातले आहे. अनेक दुभती जनावरे कवेत घेतली आहेत. गेल्या आठ दिवसात या गावात २० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तर शंभरहून अधिक जनावरांना लागण झाली आहे.
आठ दिवसापासून हा प्रकार सुरु असताना पशुवैद्यकीय यंत्रणा मात्र गंभीर दिसत नाही. जनावरांच्या लसीकरणाची जबाबदारी चुल्हाड येथील पशुचिकित्सालयावर आहे. परंतु तेथेही योग्य उपचार होत नाही. त्यामुळे आता वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी शेतकºयांची मागणी आहे.

मोहाडी (खापा) गावात पायखुरीने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. अनेक जनावरांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या गावात तातडीने शिबिर लावण्याची गरज आहे.
-विमल कानतोडे, सदस्य पंचायत समिती, मोहाडी.

Web Title: 20 animal deaths by drift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.