२० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

By admin | Published: March 31, 2016 12:52 AM2016-03-31T00:52:18+5:302016-03-31T00:52:18+5:30

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला ...

20 lakhs of fire fighting vehicles in captivity of 30 lakhs | २० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

२० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

Next

पवनी येथील प्रकार : चालकाविना वाहन पडून
अशोक पारधी  पवनी
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला रु. २० लाख किमतीचे अग्निशमन वाहन घेण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्याअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आले. मागील साडेतीन वर्षापासून वाहन चालकाशिवाय वाहन ३० लाखाच्या इमारतीमध्ये कैद करून ठेवलेले आहे.
नोकर भरतीचे अधिकार पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे वाहनचालकाची भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याने वाहनचालक उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी अग्निशमन वाहनांची सेवा पवनीकरांना तसेच तालुकावासीयांना मिळू शकली नाही. उन तापू लागले आहे. उन्हाळा सुरु झाला म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने घरांना आग लागण्याचे प्रकार सुरु होतात. अशावेळी तालुक्यातील प्रभावित जनतेला भंडारा किंवा उमरेड येथील अग्निशमन सेवेवर अवलंबून राहावे लागते. किमान १ ते दीड तास उशिराने वाहन घटनास्थळी पोहचत असते. तेव्हापर्यंत लोकांनी कितीही प्रयत्न केला. तरी खुप मोठे नुकसान झालेले असते. अशावेळी पवनी नगर परिषदेत कैद असलेल्या अग्निशमन वाहनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
अग्निशमन वाहन चालक प्रशिक्षीत असावा लागतो. ऐरवी ट्रॅक्टर चालविणारे चालक अग्निशमन वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे उपलब्ध वाहन चालक अग्निशमन वाहन चालविणे व हाताळणे हे काम करण्यास असमर्थ आहेत. चालक नव्हते त्यामुळे हे वाहन फिल्टर प्लँट शेजारी उघड्यावर दोन वर्षे उभे राहिले.
शेवटी वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ३० लाख रूपये खर्च करून गौतम वॉर्डात इमारत उभी करण्यात आली. या इमारतीमध्ये एक वर्षापासून अग्निशमन वाहन कैद करून ठेवण्यात आलेले आहे. वापरात नसल्याने वाहनाचे बॅटरीसारखे अनेक भाग निकामी झालेले राहतील म्हणजे पुन्हा वाहनावर खर्च करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येईल.
पालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक, तारतंत्री व वाहनचालक कम आॅपरेटर (अग्निशमन वाहन) अशी पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती भंडारा यांचेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जेव्हापर्यंत वाहनचालक नियुक्त होणार नाही तेव्हापर्यंत अग्निशमन वाहनास कारावासाची शिक्षा आहे असे समजण्यास हरकत नाही. वाहनाचा कारावास संपण्याचे अधिकार जिल्हास्तरावर राखून ठेवल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: 20 lakhs of fire fighting vehicles in captivity of 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.