२०२ एस.टी. बसेस अद्यापही आगारातच उभ्या; ग्रामीणमध्ये खासगी वाहनांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:03+5:302021-06-27T04:23:03+5:30
बॉक्स या गावातील प्रवाशांना बस सुरू होण्याची प्रतीक्षा जिल्ह्यातील तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर मार्गांवर बसेस धावत आहेत. त्यामुळे ग्रामीण ...
बॉक्स
या गावातील प्रवाशांना बस सुरू होण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर मार्गांवर बसेस धावत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांना दिलासा मिळत आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील डोंगरी/बुज, भंडारा-विरली, भंडारा-कवलेवाडा, भंडारा-रोंघा या गावांत अद्यापही एस.टी. बस पोहोचत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन भंडारा गाठावे लागते. यासोबतच काही गावांत कोरोनापूर्वी दोन ते तीन फेऱ्या होत होत्या. त्यांपैकी आता एक किंवा दोन फेऱ्या सुरू आहेत.
बॉक्स
ग्रामीणमध्ये आता सुरू होणार एसटी बसेस
प्रवाशांचा प्रतिसाद वाढताच ग्रामीण भागातही एस.टी. बसेस हळूहळू वाढविल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या तसेच भंडारा नागपूर, भंडारा गोंदिया, भंडारा तुमसर तसेच आंतरजिल्ह्याबाहेरील बससेवेला प्रवासी चांगला प्रतिसाद देत आहेत. जिल्हांतर्गत अनेक मार्गांवरील बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी अजून प्रवासी नसल्याने बसेस सुरू नाहीत. प्रवाशांची संख्या विचारात घेऊन लवकरच त्या मार्गावर बसेस सुरू केल्या जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.
कोट
काय म्हणतात प्रवासी
आमच्या गावात अजूनही एस.टी. बस पोहोचली नाही. भंडारा शहरापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर चिखली हे गाव आहे. नागपूर मार्गावरील खासगी वाहनानेच आम्हाला गाव गाठावे लागते.
- श्याम आकरे, प्रवासी
आमच्या गावात पूर्वीप्रमाणे बसेस येत असल्या तरीही कधी-कधी खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. एस.टी. महामंडळाकडून प्रवाशांना लोकेशन समजले पाहिजे अशा बसेस सोडल्या पाहिजेत.
निखिल बोरकर, प्रवासी