जयंतीनिमित्त २१ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:54+5:302021-01-25T04:35:54+5:30
तुमसर : कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा जास्त आहे. अनेकांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर जात आहे. रक्ताच्या अपुरेपणामुळे काहींना तर ...
तुमसर : कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा जास्त आहे. अनेकांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर जात आहे. रक्ताच्या अपुरेपणामुळे काहींना तर प्राणही गमवावे लागत आहे. हीच रक्ताची निकड लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांनी व सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेतर्फे २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तुमसर येथील अतिथीगृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर तथा नायब तहसीलदार अशोक पाटील यांनी केले. अतिथी म्हणून तहसीलदार बाळासाहेब टेळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बालबुद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन, पालिकेचे अधीक्षक सुनीलकुमार साळुंखे, सहायक करनिरीक्षक शिवानंद बरडे, प्रवीण बाबर, देवानंद सावखे उपस्थित होते.
शिबिरात रक्तदान करताना विनीत मलेवार, निलेश बांडेबूचे, जितेश भवसागर, अक्षय बडवाईक, चंद्रशेखर मानकर, गोविंद भोंडेकर, राकेश काळे, सतीश मलेवार, मनीष मारबते, रोशन निखाडे, अमोल उदापुरे, शिवनंद बरडे, सुनीलकुमार साळुंखे, देवानंद चावके, सोनित लांजेवार, ओमप्रकाश राहांगडाले, प्रवीण गुप्ता, अजित कारेमोरे, प्रशांत कुंजेकर, प्रतिभा समरीत यांनी रक्तदान केले. शिबिरात उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवर, सुधाकर कारेमोरे, संतोष पाठक, माजी आमदार चरण वाघमारे, माजी नगरसेवक सुधाकर धार्मिक, खेमराज गभणे, फिरोज शेख, जाकीर तुरक, सलाम शेख, शुभम देशमुख, अजिंक्य गभणे, रामदास बडवाईक, शुभम गभणे, उडाण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्याणी भुरे, रेखा आंबिलडुके, रिया गौरे, अमित रंगारी, सुधीर गोमासे, सहारा इंडिया बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते मनोज राखडे, गणेश सार्वे उपस्थित होते. प्रास्ताविक अमित मेश्राम, संचालन जगदीश त्रिभुवनकर, तर आभार दिगंबर समरीत यांनी मानले. कार्यक्रमासाठी विजय पाटील, प्रवीण गुप्ता, प्रशांत कुंजेकर, सतीश बन्सोड आदींनी सहकार्य केले. रक्तसंकलन शासकीय जिल्हा रुग्णालय भंडारा येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रश्मी मलेवार, परिचारिका सुरेखा भिवगडे, पीआरओ राजू नागदेवे, वाहनचालक राहुल गिरी, तंत्रज्ञ पंकज कातोरे रक्तपेढी भंडारा यांनी केले.