जिल्हा बँकेकडून २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप

By admin | Published: June 16, 2016 12:46 AM2016-06-16T00:46:33+5:302016-06-16T00:46:33+5:30

शेती कसायला पिककर्जाची गरज असताना खासगी कर्जाने शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ओढले.

210.00 crore crop distribution through district bank | जिल्हा बँकेकडून २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप

जिल्हा बँकेकडून २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप

Next

५० हजार शेतकरी लाभधारक : बँकेचे जिल्हाभरात पीककर्ज मेळावे
भंडारा / पालांदूर : शेती कसायला पिककर्जाची गरज असताना खासगी कर्जाने शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ओढले. बँका पिककर्ज देण्याकरिता सकारात्मकता दाखवत नसताना जिल्हा सहकारी बँकेने पीक कर्ज वाटप करीत राज्यात अव्वल ठरली आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत २१० कोटी रूपयांचे ४६ हजार ९७६ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे यशस्वी धुरा सांभाळत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ४६ शाखांमधून ३६८ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हिताकरिता प्राथमिकता देत शिखर बँक, नाबार्ड शासन यांनी आखून दिलेले निर्देश समोर ठेऊन उद्दिष्ठ गाठत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना शासनाने ४९५ कोटी वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात ४१ टक्के जिल्हा सहकारी बँक ५९ टक्के इतर बँकांना पीक कर्ज वाटपाचे कर्तव्य सादर केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी सातही तालुक्यात पीककर्ज मेळावे घेत पीककर्जाची व्यापकता वाढविली आहे. जिल्ह्यात २५-३० इतर बँका असून त्यांचे कर्जवाटप केवळ ३० कोटींच्या घरात आहे.
१२ एप्रिलपासून पिककर्ज वाटप प्रक्रियेला आरंभ झाला असून संपूर्ण पिककर्ज संगणकीकृत प्रक्रियेतून थेट खात्यातून वाटप सुरु आहे. अत्याधुनिक पद्धतीने जिल्हा बँक सज्ज झाली असून तांत्रिक सेवा अविरत सुरु आहे. आमचाही शेतकरी एटीएमधारक झाला असून कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतो. यामुळे वेळेची बचत होवून शेतकरी हायटेक झाला आहे. याकरिता जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ जिल्ह्यातील शाखांवर नियंत्रण ठेवून आहेत.
पिककर्ज वाटपात ओलीताला १६५०० तर कोरडवाहूला १३५०० रुपयाचे प्रमाण निश्चित केले आहे. महागाईच्या वाढत्या चक्रानुसार दरवर्षी शासन कर्जवाटपाचे दर निश्चित करून देते. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु असून आॅगस्टच्या शेवटचा शुक्रवारपर्यंत सुरु राहील. पिककर्ज वाटप स्वनिधीतूनच सुरु असून शिखर बँकेला १३५ कोटी पिककर्ज वाटपाकरिता मागणी केली आहे. जिल्हाधिकरी यांनी २७० कोटींचे जिल्हा सहकारी बँकेला दिलेले उद्दिष्ट्य निश्चित पूर्ण होईल. (शहर प्रतिनिधी / वार्ताहर)

Web Title: 210.00 crore crop distribution through district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.