दुसऱ्या दिवशी भरती प्रक्रियेत २१४ उमेदवार अपात्र

By admin | Published: November 9, 2016 12:54 AM2016-11-09T00:54:46+5:302016-11-09T00:54:46+5:30

भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

214 candidates ineligible for the recruitment process in the next day | दुसऱ्या दिवशी भरती प्रक्रियेत २१४ उमेदवार अपात्र

दुसऱ्या दिवशी भरती प्रक्रियेत २१४ उमेदवार अपात्र

Next

वनविभागाची भरती प्रक्रिया : १ हजार ६० उमेदवारांनी लावली हजेरी, बोचऱ्या थंडीतही उमेदवारांची गर्दी
भंडारा : भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काल पहिल्या दिवशी ८४४ उमेदवारांनी हजेरी लावली. तर आज दुसऱ्या दिवशी १०६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. यातील २१४ उमेदवारांना अपात्र करण्यात आले असून ८४६ उमेदवार पात्र ठरले आहेत.
नागपूर वनवृत्तांतर्गत भंडारा येथील वनपाल या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी नागपूर वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांनी भंडारा येथील अधिकाऱ्यांकडे १२ हजार नोकरी इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्याची जवाबदारी सोपविली आहे. काल सोमवारपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. येथील गडेगाव लाकूड आगारात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी प्रत्येक दिवसाकरिता दोन हजार उमेदवारांना बोलाविण्यात येत आहे. काल पहिल्या दिवशी केवळ ८४४ उमेदवारांनी हजेरी लावली तर आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी दोन हजारांपैकी केवळ १ हजार ६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी घेण्यासाठी हजेरी लावली. ९४० उमेदवारांनी या प्रक्रियेकडे पाठ दाखविली आहे.
पहाटेपासून सुरु झालेल्या या प्रक्रियेत पुरुष उमेदवारांची उंची, वजन व छाती तर स्त्री उमेदवारांची उंची व वजन अशी शारीरिक चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत खरे उतरणाऱ्या उमेदवारांची पात्र म्हणून निवड होत आहे. आज दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला १ हजार ६० उमेदवारांनी हजेरी लावली. यात ८१९ पुरुष तर २४१ स्त्री उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी ८४६ उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीतून करण्यात आली. त्यामुळे २१४ उमेदवार यात अपात्र ठरले आहेत. ४४६ पात्र उमेदवारांमध्ये ६४५ पुरुष तर २०४ स्त्री उमेदवारांचा समावेश असून १७४ पुरुष अपात्र ठरले असून ४० स्त्री उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांना पुढील प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे.
आज दुसऱ्या दिवशीही सहा टेबलवरूनच दिवसभर ही शारीरिक चाचणी प्रक्रिया राबविण्यात आली. उद्या तिसऱ्या दिवशीही दोन हजार उमेदवारांना उपस्थित राहण्याचे पत्र पोहचता केले आहे. भंडारा उपवन संरक्षक कार्यालयाचे वन कर्मचारी ही प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. वन विभागाने या भरती प्रक्रियेची जबाबदारी येथील वनकर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. या सोबतच उमेदवारांची शारीरिक चाचणी पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे तज्ज्ञ अधिकारी बोलाविले आहेत. त्यांच्या सोबतच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारीही भरती प्रक्रियेसाठी आलेल्या स्त्री व पुरुष उमेदवारांची चाचणी घेत आहेत. अगदी पहाटेपासून डोळ्यात अंजन घालून वनविभागाचे कर्मचारी विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबवित आहेत. सध्या कडाक्याची थंडी वाढली असतानाही नोकरीच्या आशेने दूरवरून उमेदवार भंडारा शहरात रात्रीच दाखल होत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 214 candidates ineligible for the recruitment process in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.