गौण खनिजातून २२ कोटींचा महसूल
By admin | Published: February 13, 2017 12:17 AM2017-02-13T00:17:49+5:302017-02-13T00:17:49+5:30
बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत या दहा महिन्यात जिल्ह्यातील ५३ वाळूघाटांपैकी २१ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला.
दंडापोटी २.७५ लाखांची वसुली : ५३ पैकी २१ रेतीघाटांचा लिलाव
इंद्रपाल कटकवार भंडारा
बांधकामासाठी उपयुक्त असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत या दहा महिन्यात जिल्ह्यातील ५३ वाळूघाटांपैकी २१ वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला. त्यातून शासनाला २२ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय जानेवारी अखेरपर्यंत महसूल व खनिकर्म विभागाने १०७९ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज चोरी प्रकरणात कारवाई करून २ कोटी ७५ लक्ष ५३ हजार ४२३ रुपये महसूल शासनाला मिळवून दिला आहे. ९७ अनिधकृत रेती व इतर गौण खनिज प्रकरणात कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत काहीवाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. वाळूप्रकरणी ठेकेदार, लिलावधारक, वाहन मालक-वाहनचालक दोषी आढळल्यास त्यांचेविरूध्द प्रचलित नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहे.
परिणामी वाळूचा व इतर गौण खनिजांचा नियमबाह्य उपसा तसेच चोरटी वाहतूक करणाऱ्यावर आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
जिल्ह्याला गौण खनिजांचे वरदान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रेतीचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक होवू नये यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके गठीत करण्यात आली असून ही पथके प्रभावीपणे काम करीत आहेत.
- सुरेश नैताम,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा.