सिंचन प्रकल्पांत २२ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:02 PM2019-01-21T23:02:48+5:302019-01-21T23:03:19+5:30
अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपुऱ्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना बसला असून पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील ६३ प्रकल्पांमधील केवळ २२.१८ टक्के जलसाठा आहे. सिंचनाची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात ८.१० दलघमी जलसाठा असल्याची उन्हाळी पिकांना प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही. आगामी काळातील टंचाई लक्षात घेता या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी व चारापिकासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण ६३ प्रकल्प आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बपेरा, मोहाडी तालुक्यातील टेकेपार बोथली आणि सोरणा हे चार मध्यम प्रकल्प आहे तर ३१ लघु प्रकल्प असून २८ माजी मालगुजारी तलाव आहे. चांदपूर प्रकल्पाचा प्रकल्पीय संकल्पीत जलसाठा २८.८७ दलघमी असून सध्या याप्रकल्पात ७.४० दलघमी साठा आहे. तर बपेरा, टेकेपार बोथली आणि सोरर्णा या प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पात दुप्पट म्हणजे १५.८३ टक्के जलसाठा होता. यावर्षी पडलेल्या अपुºया पावसाने पुर्णक्षमतेने प्रकल्प भरले नाहीत.
जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्प क्षमता ५३.५४ दशलक्ष दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १२.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा असून २४.२५ दलघमी मृतसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे टक्केवारी १२.९८ आहे. २८ माजी मालगुजारी तलावांची प्रकल्पीय संकल्पीत क्षमता २५.३८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ५.९१ दलघमी म्हणजे २३.२९ टक्के जलसाठा आहे.
या प्रकल्पातील अपुºया जलसाठ्याचा परिणामी उन्हाळी पिकांवर होणार आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडले जाणार नाही. सर्व पाणी पिण्यासाठी आणि चारापिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.
पाच वर्षांपासून घटतोय जलसाठा
धान उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे. मात्र गत पाच वर्षाचा तुलनात्मक अभ्यास केला असता दरवर्षी पावसाचे आणि परिणामी जलसाठ्याचे प्रमाण कमी होत आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८१.६५ टक्के जलसाठा होता. २०१५ मध्ये निचांकी पातळीला जावून १८.५५ टक्के, २०१६ मध्ये २३.२६ टक्के आणि २०१७ मध्ये ४३.७५ टक्के जलसाठा होता. मात्र गत पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या प्रकल्पात २२.१८ टक्के जलसाठा आहे.