अंगणवाडी सेविका अन् मदतनिसांना साड्यांसाठी २३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 04:40 PM2023-05-18T16:40:20+5:302023-05-18T16:40:54+5:30
जिल्ह्यात १ हजार २२२ अंगणवाडी सेविका व ९८२ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २२०४ सेविका व मदतनीस कार्यरत आहेत.
- देवानंद नंदेश्वर
भंडारा : जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या साडीसाठी विभागाला २३ लाख ३५ हजार रुपये मिळाले आहेत. हा पैसा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात १ हजार २२२ अंगणवाडी सेविका व ९८२ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २२०४ सेविका व मदतनीस कार्यरत आहेत.
राज्य शासनाच्या वतीने पोषण अभियानांतर्गत अंगणवाड्यांसाठी विविध सुविधा पुरविल्या जात असतात. शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मार्फत चालविले जाते. यासाठी शासनाकडून त्यांना गणवेशसाठी साडीकरिता पैसे दिले जाते.
जिल्ह्यात १२२२ सेविका, ९८२ मदतनीस
जिल्ह्यात १ हजार २२२ अंगणवाडी सेविका व ९८२ मदतनीस आहे. या सेविका व मदतनिसांसाठी शासनाकडे ३१ मार्चपूर्वी निधी मिळाल्यामुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे वळता करण्यात आला. त्यानंतर तो लगेच त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.