बावनथडी धरणात २३ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:45 PM2017-09-18T22:45:54+5:302017-09-18T22:46:27+5:30

पावसाच्या तुटीमुळे सध्या बावनथडी धरणात केवळ २३.५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. ३१ जुलै राजी धान पिकाकरिता पाणी सोडण्यात आले होते.

23% water supply in Bavanthadi dam | बावनथडी धरणात २३ टक्केच जलसाठा

बावनथडी धरणात २३ टक्केच जलसाठा

Next
ठळक मुद्देपावसाची तूट : लहान वितरिकांची कामे शिल्लक, रविवारपासून पाण्याचा विसर्ग

मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पावसाच्या तुटीमुळे सध्या बावनथडी धरणात केवळ २३.५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. ३१ जुलै राजी धान पिकाकरिता पाणी सोडण्यात आले होते. २६ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाने दडी मारल्याने पुन्हा धान पिकाकरिता रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. बावनथडी प्रकल्पाची वितरिकेची कामे शिल्लक असल्याने देव्हाडी परिसरातील गावे सिंचनापासून वंचित आहेत.
बावनथडी प्रकल्प तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरला आहे. पºहे व धान रोवणीच्या काळात बावनथडी प्रकल्पातूनपाणी सोडण्यात आले होते. शाखा १ व शाखा २ मधून पाणी सिंचनाकरिता बांधापर्यंत गेले. १९.५ दलघ पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. ३१ जुलै ते २६ आॅगस्ट पर्यंत २७ दिवस पाणी धरणातून सोडण्यात आले होते. मध्यंतरी पावसाने हजेरी लावली. पाणी विसर्गमुळे धरणात मृत पाणी साठा शिल्लक होता. पावसामुळे पुन्हा धरणात २३.५ टक्के पाणी साठा जमा झाला.
रविवारपासून पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग सिंचनाकरिता सुरु करण्यात आला. धानपीक सध्या शेवटच्या टप्प्यात असून सध्या पाण्याची धान पिकाला नितांत गरज आहे. भारनियमनामुळे विहिरीतून पाणी उपसा करणे कठीण झज्ञले आहे. केवळ ८ ते १० तास वीज प्रवाह सुरु आहे. वीजेचा भरवसा नाही. धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. पुन्हा रविवारी बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बावनथडी धरणामुळे सुमारे १५ हजार शेतीला सिंचनाचा लाभ यावर्षी झाला आहे. यात शाखा १ व शाखा २ अंतर्गत तुमसर, राजापूर, मोहाडी, वितरिका, चिखली मायनर, कारली वितरिका, रोहना एकलारी वितरिका, बघेडा जलाशय, सोरणा जलाशयात आ. चरण वाघमारे यांच्या प्रयत्नामुळे पाणी सोडण्यात आले.
बोरी, कोष्टी, ब्राम्हणी, देव्हाडी व तुमसर शहर परिसरात बावनथडी प्रकल्पाचे पाणी अद्याप पोहोचले नाही. मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅकखालून येथे वितरिका तयार करण्याची मंजूरी रेल्वे प्रशासनाने दिली नाही. देव्हाडी परिसरातील सुमारे २५० ते ३०० शेतकºयांना शेतीचा मोबदला अद्याप मिळाला नाही अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. याकरिता शेतकºयांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकमुळे येथे अडचणी निर्माण झाल्या आहेत. माडगी येथे नदी पात्रात दगड व बंधाºयाची मागण्ीा आहे.
रेल्वे ट्रॅकखालून जाणाºया वितरिकेची कामे त्वरित करण्याची गरज आहे. मागील ३५ वर्षापासून या प्रकल्पाची कामे संथगतीने सुरे आहेत. लहान वितरिकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय देव्हाडी शिवारात शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळणार नाही. जिथे वितरिका तयार करण्यात आल्या त्या बुजलेल्या स्थितीत आहेत. त्या सर्व वितरिकांचे अस्तरीकरण अजून शिल्लक आहे.

बावनथडी प्रकल्पातून शेतकºयांकरिता गरज असल्यास पाणी सोडण्यात येत आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर असून यावर्षी सुमारे १५ हजार हेक्टर शेतीला सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले.
- रवी रामटेके, उपविभागीय अधिकारी, बावनथडी प्रकल्प तुमसर
बावनथडी प्रकल्पाच्या लहान वितरिकेची कामे शिल्लक असून देव्हाडी, माडगी शिवारता अद्याप पाणी पोहोचले नाही. शेतकºयांच्या जमिनी वितरिकेत गेल्या त्यांना अजूनपर्यंत शासनाने मोबदला दिला नाही. रेल्वे ट्रॅकखालून परवानगी केव्हा मिळेल हा खरा प्रश्न आहे.
- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडी

Web Title: 23% water supply in Bavanthadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.