सिंदपुरी कोविड सेंटरवर २३१ कोविड रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:40+5:302021-04-26T04:32:40+5:30

भुयार : पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, भंडारा यांच्या निर्देशानुसार सिंदपुरी येथील सामाजिक ...

231 Kovid patients were cured at Sindpuri Kovid Center | सिंदपुरी कोविड सेंटरवर २३१ कोविड रुग्ण झाले बरे

सिंदपुरी कोविड सेंटरवर २३१ कोविड रुग्ण झाले बरे

googlenewsNext

भुयार : पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, भंडारा यांच्या निर्देशानुसार सिंदपुरी येथील सामाजिक न्याय मुलीचे वसतिगृह येथे १ एप्रिल रोजी १५० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले होते.

सदर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली असून, गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा, यासाठी ७० ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी दिली. सदर कोविड सेंटरवर उपचारासाठी भंडारा जिल्ह्यातीलच नाही, तर भिवापूर, उमरेड व ब्रह्मपुरी तालुक्यांतील ही कोविड रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. आजपर्यंत या केंद्रावर २७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, २३१ रुग्ण बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली. सद्य:स्थितीत ४६ गंभीर रुग्णांवर कोविड केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. कोविड उपचारादरम्यान मृत पावलेल्या व्यक्तीवर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी खापरी येथे स्मशानभूमी उभारली आहे. ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग यांच्यामार्फत उपचार, महसूल, पोलीस व शिक्षण विभाग यांची नियुक्ती केंद्रावर केली आहे.

कोट बॉक्स

सिंदपुरी कोविड केंद्रात कोणत्याही सुविधेची कमतरता राहू नये, तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना पूर्ण उपचार मिळावा यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तथा तालुक्यातील कोरोना साथीच्या परिस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत सूचना देण्यात येत आहे.

-नरेंद्र भोंडेकर, आमदार, भंडारा

Web Title: 231 Kovid patients were cured at Sindpuri Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.