५६ हजार शेतकऱ्यांना २४३ कोटींचे पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:39 PM2018-09-17T22:39:50+5:302018-09-17T22:40:13+5:30
शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा येथील लक्ष्मी सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमसभेला आमदार चरण वाघमारे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक कैलास नशिने, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तितीरमारे, अंजिराबाई चुटे, कवलजिंतसिंह चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती धनेंद्र तुरकर, आनंदराव वंजारी, तुमसर बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे उपस्थित होते.
सुनील फुंडे म्हणाले, २००५-०६ पासून जिल्हा बँक निव्वळ नफ्यात आहे. चालू वर्षात बँकेला १०.२८ कोटी रूपयांचा नफा झाला असून २.०४ लाख निव्वळ नफा आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर येथे शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एटीएम, नेट बँकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेती क्षेत्र जास्तीत जास्त ओलीताखाली आणण्यासाठी कर्ज पुरवठा करणे सुरू आहे. प्रधानमंत्री मुद्रालोन, सोनेतारण, पगार तारण, पेंन्शन तारण आदी कर्जाची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१५-१६ व २०१६-१७ चे केंद्र शासनाकडून ५७०.४४ लाख रूपये व्याजाची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. २०१७-१८ चा व्याज प्रस्ताव संस्थांकडून बँकेला प्राप्त झाला नाही. २००७-२००८ ते २०१६-१७ पर्यंत मार्केटिंग फेडरेशनकडून खड्या हुंड्यावरील एकूण ५६१.१० लाख मिळाले नाही. यामुळे शासनाचा योजना राबविताना बँकेने हित कसे सांभाळावे हा प्रश्न संचालक मंडळापुढे येत असल्याची खंत सुनील फुंडे यांनी व्यक्त केली. कर्मचाºयांनी ग्राहकांना वेळेवर उत्तम सेवा द्यावी, असा दमही या आमसभेत भरला. या आमसभेत विविध ठराव पारित करण्यात आले.
११०० कोटींचा ठेवीची अपेक्षा
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २००६ मध्ये विभाजन झाले. त्यावेळी एकूण भाग भांडवल १०.४१ कोटी व २६३.१७ कोटी ठेवी होत्या. मात्र आमसभेशी संबंधीत वर्षाअखेर बँकेत एकूण भाग भांडवल ३६.७० कोटी व एकूण ठेवी ९८६.५८ कोटी आहे. पुढील वर्षी किमान ११०० कोटी रूपयांचा ठेवी बँकेत असतील अशी अपेक्षा फुंडे यांनी व्यक्त केली.