लोक अदालतीत २४९ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:11 PM2018-07-15T22:11:05+5:302018-07-15T22:11:20+5:30
तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली.
यात ४५६ प्रलंबित प्रकरणापैकी २९ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. प्रलंबित प्रकरणातून १६ लाख २५,८५७ रुपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये बँकेची १०० प्रकरणांपैकी ३ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून २,००४ रुपयांची वसुली करण्यात आली. १९ ग्रामपंचायतीच्या १७६६ प्रकरणापैकी १९१ प्रकरणातून ३,१२,८११ रुपयांची वसुली करण्यात आली. नगर परिषदेच्या ९४ प्रकरणापैकी १२ प्रकरणातुन ६४,२१९ रुपयांची वसुलीकरण्यात आली. राज्य वीज वितरण कंपनीच्या २११ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे निकाली निघाली असुन त्यातुन ६४,००० रुपयांची वसुली करण्यात आली. बीएसएनएल च्या १०२ प्रकरणापैकी १० प्रकरणे निकाली निघाली असून त्यातुन २२,४५२ रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण २४९ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातुन २०,९१,३४३ रुपयांची राष्ट्रीय लोकअदालतीतून दंड रुपाने वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतच्या पॅनेलवर न्यायाधीश न. के. वाळके, अॅड. के. जी. रामटेके, आर. एम. अंबादे (समाजसेवक) यांनी काम पाहिले. तालुका वकील संघाचे अधिवक्ता, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, महा. राज्य विज वितरण कंपनीचे, नगर परिषदेचे कर्मचारी, बिएसएनएल चे कर्मचारी, जे. टी. रामटेके, पी. एल.व्ही., एल.ए. मल्लानी, पी.एल.व्ही. तसेच न्यायालयीन कर्मचारी जी. के. उपासे, मानकर, एस.एस. निनावे, विनोद भेदे, एस.एस. शामकुवर, आर. एस. खेताडे, एस.एन. मुगलमारे, एन. जी. रहांगडाले, पी. सी. मेश्राम, डी. के. गौर, आर. पी. वाघमारे, गणविर यांनी सहकार्य केले.