इंधन दरवाढीमुळे खासगी प्रवासी वाहनांची २५टक्के दरवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:43+5:302021-08-19T04:38:43+5:30
भंडारा : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसत आहे. गेल्या दोन महिन्यापासून पेट्रोलने शंभरी पार ...
भंडारा : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा वाहतूक क्षेत्राला बसत आहे. गेल्या दोन महिन्यापासून पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलही शंभरच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे पूर्वी खासगी वाहने दहा ते बारा रुपये दराने मिळत होती. परंतु आता डिझेलची दरवाढ झाल्याने १४ रुपये प्रति किलो मीटरप्रमाणे दर वाढले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केल्याने महागाई वाढली आहे. डिझेलच्या दरवाढीचा फटका गाडी मालकांसह ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही महाग झाल्याने सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जनसामान्यांतून होताना दिसून येत आहे.
अनेक गाडी मालकांनी बोलताना डिझेलच्या दरवाढीने एकीकडे व्यवसाय कमी झाला आहे तर दुसरीकडे बँकेचे अधिकारी कर्मचारी हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. यासाठी शासनाने आम्हाला मदत देण्याची गरज आहे.
कोट
गाडीचा हप्ता कसा भरायचा ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने प्रवासी वाहतूक व्यवसाय परवडेनासा झाला आहे. तिकडे दररोज डिझेलची दरवाढ होत आहे तर दुसरीकडे तिकीटदर मात्र आहे तेवढेच आहेत. त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही.
रोशन आकरे, गाडीमालक
कोट
इंधनाचे दर वाढले...
इंधनाचे दर हे गतवर्षीच्या तुलनेत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गाडी मालकांसह ग्राहकांनाही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. आमचे कर्जाचे हप्तेही थकले आहेत. जीवन जगताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. खूप त्रास सहन करावा लागत आहे.
आशिष गायधने, गाडीमालक