२५ शेतकऱ्यांना मिळणार ‘श्री’ पद्धतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:22 AM2017-07-23T00:22:17+5:302017-07-23T00:22:17+5:30

पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शेती सोबतच आता "श्री" पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

25 farmers will get benefit of 'Shree' method | २५ शेतकऱ्यांना मिळणार ‘श्री’ पद्धतीचा लाभ

२५ शेतकऱ्यांना मिळणार ‘श्री’ पद्धतीचा लाभ

Next

कृषी विभागाचा उपक्रम : तुमसर तालुक्यातील पिपरी येथील प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शेती सोबतच आता "श्री" पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाच्या वतीने "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" या अभियांतर्गत तुमसर तालुक्यातील पिपरा येथील २५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाड्याच्या माध्यमातून "श्री" पद्धत लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक प्रणिता मिलमिले यांनी या मार्गदर्शनासह परिसरातील शेतकऱ्यांना श्री पद्धतीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालविले आहे.
दिवसें दिवस शेती उत्पादनासाठी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. शेती उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्रीच्या किंमतीचे भावही दुप्पट वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक बोझ्याखाली दबल्या गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी कृषी विभागाने आता उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाची अंमलबजावणी केली आहे.
पिपरा येथील निवड केलेल्या २५ शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकरातील धान व त्यावरील खर्च कृषी विभाग करीत आहे. यासोबतच या शेतकऱ्यांना तुळ तथा एचएमटी धानाची बिजाई मोफत देण्यात आली आहे.
अन्य बिजाई खरेदी करून त्याचे बिल कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर कृषी विभागाच्या नियोजनानुसार त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. कृषी विभागाचे हे अभियान शेतकऱ्यांसाठी तारक ठरेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे.
कृषी विभाग उचलेल खर्च
पिपरा या गावातील २५ शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या एक एकरात श्री पद्धतीचा वापर करून रोवणी करण्यात येत आहे. या एक एकरावर होणारा खर्च हा कृषी विभाग करीत आहे.

Web Title: 25 farmers will get benefit of 'Shree' method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.