भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

By Admin | Published: August 22, 2016 12:31 AM2016-08-22T00:31:00+5:302016-08-22T00:31:00+5:30

तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे.

25 lakhs of profits from vegetable cultivation | भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

googlenewsNext

चवळा व कारल्याची लागवड : पटले दाम्पत्यांची दारिद्र्यावर मात
चंदन मोटघरे लाखनी
तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे. दरवर्षी तीन लक्ष रूपयापर्यंत शुद्ध नफा भाजीपाला लागवडीतून मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
संयुक्त कुटुंबापासून २००४ मध्ये वेगळे झाल्यानंतर मनोहर पटले व त्यांच्या अर्धांगिणी प्रतीभा पटले यांना संघर्ष करावा लागला. दीड एकर शेतीमध्ये धान पिकाची लागवड केली. पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. २००७ पासून शेतात उन्हाळी भेंडी लावायला सुरुवात करून भाजीपाला लागवडीकडे लक्ष पुरविले. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन भाजीपाल्याच्या इतर जातीची लागवड केली.
प्रारंभी पटले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. दुसऱ्याच्या शेतीवर मजुरीसाठी जावे लागत होते. भाजीपाला लावगडीनंतर पटले यांच्या जीवनस्तरामध्ये बदल घडून आला. भाजीपाला भंडारा व नागपुरच्या भाजीमंडीमध्ये जावू लागला. पटले यांच्याकडे सध्या दोन मालवाहू गाड्या आहेत. मोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पावसाळ्यात भंडारा व उन्हाळ्यात नागपूर येथे जात असते. पटले यांच्यासोबत त्यांना इतर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देवून विकास साधला आहे.
२०१५-१६ मध्ये मनोहर पटले यांना कृषी विभागाद्वारे ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचनाची योजना मिळाली आहे. शेतात विंधन विहिर आहे. बाराही महिने मुबलक पाण्याचा पुरवठा होत असतो.
२०१६ मध्ये पटले यांनी चवळा व कारल्याचे उत्पादन ४० आर शेतात घेतले. चवळा व कारला लावल्यामुळे ४ लक्ष ७५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. त्यांची बि बियाणे, खत, कीटकनाशके, मशागत खर्च, मजुरी इत्यादीसाठी २ लक्ष २५ हजार रुपये खर्च आला. त्यांना ४ महिन्यात २ लक्ष ५० हजार रुपयाचा शुद्ध नफा मिळालेला आहे.
पटले यांनी शेतात चवळा व कारल्यासोबत लवकी व काकड्यांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. मनोहर पटले यांचा भाजीपाला लागवडीमुळे जीवनस्तर उंचावलेला आहे. मनोहर पटले यांच्या पत्नी प्रतीभा पटले या शेतात मेहनत घेत असतात.
मनोहर पटले बाजारपेठेकडे लक्ष देतात. पटले पती पत्नी यांनी मेहनत व कौशल्याच्या मदतीने दारिद्र्यावर मात केली. त्यांच्या दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देवून भाजीपाल्याची लागवड करून मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्शाचा मानदंड निर्माण करणारे मनोहर पटले शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल कौतूक केल्या जात आहे.

Web Title: 25 lakhs of profits from vegetable cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.