२५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:46 AM2018-08-10T00:46:31+5:302018-08-10T00:47:10+5:30
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंद चा शिक्कामोर्तब लावला असून त्याची अमंमलबजावणीही सर्वत्र सुरु झाली असून दंडात्मक कार्यवाहीचे अधिकार नगर परिषदला प्राप्त झाले आहेत. सुरुवातीला नगर परिषदने वर्तमानपत्रात, प्लेक्स बॅनर्स, होर्डिंग, जनजागृती रॅली तसेच लाऊडस्पिकरवर सुचना देवून प्लास्टिक बंदीस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तरी, देखील शहरात राजरोसपणे व्यापाऱ्यामार्फत प्लास्टिकच सर्रास वापर सुरु असल्यामुळे मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी १०-१० कर्मचाºयांचे दोन पथके तैनात करुन किराणा ओळीसह मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, व्यवसायी दामोदर सोनवाने, हटवार किरणा, निखाडे किराणा, अजय प्लास्टिक दुकान, आहुजा किराणा दुकान यांचेवर विविध दंड आकारुन २५ हजार रुपयाचे दंड वसूल करण्यात आले आहे.
यापुढे शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी प्लॉस्टीक व थर्मोकोलचा वापर टाळून शासनाच्या धोरणात्मक कार्यास सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकाºयांनी केले आहे.