२६० कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:06+5:30

कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अवघे २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

260 crore crop loan disbursement | २६० कोटींचे पीक कर्ज वाटप

२६० कोटींचे पीक कर्ज वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे४२६ कोटींचे उद्दिष्ट : सर्वाधिक पीक कर्जवाटप जिल्हा बँकेत, कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी कर्जमाफीमुळे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढलेल्या भंडारा जिल्ह्यात कर्ज वाटपाचा टक्का अद्यापही ६१ टक्क्यांवरच असून आतापर्यंत २६० कोटी ५६ लाखांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. त्यातही सर्वाधिक पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने २१३ कोटी रुपये केले आहे. यंदाही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना नकारघंटाच देत आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अवघे २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २३ जून पर्यंत ५२ हजार ५९८ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत असली तरी रेग्यूलर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत कर्ज भरण्याची मुदत देण्यात आली. त्यामुळे खरीपात जिल्ह्यात प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने पीक कर्ज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत अधिकाअधिक कर्ज वाटप करण्याचे आवाहन बँकांसमोर उभे ठाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पीक कर्जासाठी प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५० हजारांच्या वर असते. मात्र शेतकरी कर्जमाफीमुळे यंदा पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे या नव्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आणि ग्रामस्तरावर पीक कर्ज वाटपाचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले असले तरी नव्याने कर्ज घेणाºया शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. त्यातच बँकांना मुद्रांक शुल्क ई चलनाद्वारे घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत बहुसंख्य शेतकऱ्यांना पीक कर्ज कितपत मिळेल असा प्रश्न आहे. वर्तमान स्थितीत एकुण उद्दिष्टांच्या ५२ हजार ५९८ शेतकऱ्यांना अर्थात २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जून अखेरपर्यंत आणखी किती शेतकºयांना पीक कर्ज मिळेल हा प्रश्न आहे.

नाहरकत प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची भटकंती
सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांसह सावकारांकडे धाव घ्यावी लागत आहे. बँकातून कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रांची किचकट प्रक्रिया असल्याने बँकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. अलिकडे बँकांमध्ये नाहरकत प्रमाणपत्रांसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. मात्र कोरोनाच्या नावाखाली अधिकारीच अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.

जिल्हा बँकेचे कर्जवाटप ८२ टक्क्यांवर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी २६० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ४६ हजार ६८८ शेतकºयांना २१२ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. याची टक्केवारी ८२ आहे. यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक बँकांनी केले २५ टक्के कर्ज वितरण
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना १३४ कोटी २५ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ११५ शेतकऱ्यांना ३३ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. त्याची टक्केवारी २५ इतकी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका माघारल्याचे दिसते.

Web Title: 260 crore crop loan disbursement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.