मोफत प्रवेशासाठी 2600 अर्ज; 767 जणांनाच लागणार ‘लॉटरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 05:00 AM2022-03-11T05:00:00+5:302022-03-11T05:00:44+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य बाबींची काटेकाेर पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. त्याअंतर्गत मेरीट यादी जाहिर करुन लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीच्या माेफत प्रवेशासाठी १० मार्च राेजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २ हजार ६०३ अर्ज आले आहेत. जिल्ह्यात ९१ शाळांमधून ७६७ विद्यार्थ्यांना माेफत प्रवेशासाठी लाॅटरी लागणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य बाबींची काटेकाेर पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. त्याअंतर्गत मेरीट यादी जाहिर करुन लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरण्यात येणार आहे. जागेपेक्षा चारपट जास्त अर्ज दाखल झाल्याने कुणाला ही लाॅटरी लागते हे लवकरच समजेल.
२५ टक्के जागा राखीव
- आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२- २३ या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यातील ९१ शाळांमधून ७६७ जागा भरल्या जाणार आहेत.
- आरटीई अंतर्गत या शाळांमध्ये असलेल्या एकूण जागांपैकी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असते. याअंतर्गत पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.
या कागदपत्रांची आवश्यकता
ऑनलाईन अर्ज दाखल करीत असताना पाल्याचा जन्मदाखला, ३ किमीपेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना क्रमांक देणे आवश्यक आहे. यासह गॅसबुक, पासबुक जाेडणे बंधनकारक आहे.
लाॅटरी पध्दतीने जागा भरणार
आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला फेब्रुवारी महिन्यापासूच प्रांरभ झाला हाेता. २५ टक्के राखीव जागांतर्गत पालकांना या संदर्भात लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. त्या अंतर्गत गुरुवार १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने २ हजार ६०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता लाॅटरी पध्दतीने जिल्ह्याभरातील या जागा भरल्या जाणार आहेत. प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविली जात आहे. आहे.
- मनाेहर बारस्कर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा