२.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:49 PM2018-05-24T22:49:04+5:302018-05-24T22:49:18+5:30
भंडारा तालुक्यातील मौजा घोडेझरी ते पहेलाकडे येणाऱ्या मार्गावर खबºयांच्या आधारे मिळालेल्या मािहतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारूसह अन्य साहित्य मिळून २ लक्ष ६९ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. यात एकाला अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील मौजा घोडेझरी ते पहेलाकडे येणाऱ्या मार्गावर खबºयांच्या आधारे मिळालेल्या मािहतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारूसह अन्य साहित्य मिळून २ लक्ष ६९ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. यात एकाला अटक करण्यात आली आहे.
एका सिल्व्हर रंगाच्या चारचाकी क्रमांक एम.एच. १२ बि. व्ही. ३१४० वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूला अठरा खरडयाच्या खोक्यात देशी दारु आढळली. यात १८० मिलीच्या एकूण ८६४ बॉटल्या भरुन असलेल्या चारचाकी वाहनासह एकूण २ लाख ६९ हजार ९२८ रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे विविध कलमांतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली. भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांच्या आदेशानुसार भंडारा निर्वाचन क्षेत्रात लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने बनावट देशी, विदेशी मद्य व परराज्यातील अवैद्य दारु विक्री व उत्पादनाविरुध्द विशेष धडक मोहिम राबविण्यात आली. यात गुरुदेव गुलाब नान्हे रा. मंडईपेठ (अडयाळ) याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.