२९ प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:42 AM2019-09-10T00:42:29+5:302019-09-10T00:42:54+5:30
पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा मुबलक साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी ७९़२३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़
कोसळधारा : जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ७९ टक्के जलसाठा
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा मुबलक साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाºया लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी ७९़२३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात १.२ टक्क्यानी वाढ झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९७़८४, बघेडा ७५़६३, बेटेकर बोथली ४३.८३ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २०.९२ टक्के आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ७२़८२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ९०.५० टक्के आहे़
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सध्यस्थितीत ९़६४५ दशलक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ९ सप्टेबर रोजी ६३ प्रकल्पात ९४़९९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ७८़०३ एवढी होती.
तुडूंब प्रकल्प
भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांपैकी २९ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यात तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, परसवाडा, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, भंडारा तालुक्यातील मंडनगाव, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, पिलांद्री, साकोली तालुक्यातील गुढरी, एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील मुरमाडी हमेशा, वाकल, रेंगेपार (कोहळी), लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राड, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झिरी यांचा समावेश आहे.