३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:06 AM2021-02-18T05:06:42+5:302021-02-18T05:06:42+5:30
भंडारा : येथील जे. एम. पटेल महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ जानेवारी ...
भंडारा : येथील जे. एम. पटेल महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान राबविण्यात आलेल्या ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपीय कार्यक्रम वसंत जाधव, पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील पर्ल सभागृह येथे उत्साहात पार पडला.
रस्ता सुरक्षा अभियान वाहतुकीचे नियम, अपघात टाळण्यासाठी घेण्यात येणारी सावधगिरी याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये भंडारा जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्नेहा बालपांडे, द्वितीय पारितोषिक मेघा मिश्रा, तृतीय पारितोषिक मोहन राजू नंदनवार, पोस्टर स्पर्धेत प्रथम पारितोषिक राहुल रामसिंग बैस, द्वितीय पारितोषिक प्राची वामन लेंडे, तृतीय पारितोषिक सलोनी महिपाल बावणे, वाद विवाद स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रांजली गणेश मेश्राम, द्वितीय पारितोषिक पूजा पांडुरंग खोब्रागडे, तृतीय पारितोषिक राहुल रामसिंग बैस तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे पथनाट्य सादर करणारे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पोलीस प्रशासनाअंतर्गत जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस नाईक कार्तिक कामथे, पोलीस हवालदार अर्जुन जांगडे, पोलीस नाईक स्वप्नील गुल्हाने, पोलीस नाईक लोकेश ढोक, महामार्ग पोलीस केंद्र, गडेगाव भंडारा येथील पोलीस नाईक सोमेश्वर लांबकाने, पोलीस नाईक विनोद शिवणकर, पोलीस शिपाई उमेश टेंभुर्णीकर यांना रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच रस्ता सुरक्षा कार्यक्रमात विशेष सहाय्य करणारे लायन्स क्लब भंडारा (सेंट्रल)चे सचिन लेदे, पंकज राजाभोज, हुसैन फिदवी यांना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कदम म्हणाले, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघात टाळता येतील. कार्यक्रमाचे उद्घाटक अनिकेत भारती, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वसामान्य वाहतुकीचे नियम पाळावेत व सुरक्षित वाहनांचा वापर करावा, असे नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी तरुणांना वाहने नियंत्रित चालविण्याचे आवाहन केले. यासह आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने उपस्थितांची मने जिंकली. संचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर व रोसेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे यांनी केले. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी आभार मानले.
कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख जितेंद्र किरसान, डॉ. श्रीधर शर्मा, डॉ. रोमी बिष्ट, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. विना डोंगरे, डॉ. अपर्णा यादव, प्रा. शैलेश तिवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक लोकेश काणसे, पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखाचे कर्मचारी, सर्व विभागांचे प्रमुख, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.