धानाच्या चुकाऱ्याचे ३३ कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:02 AM2019-06-14T01:02:42+5:302019-06-14T01:03:12+5:30
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या उन्हाळी हंगामातील तब्बल २ लाख क्विंटल धानाचे सुमारे ३३ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावार शेतकऱ्यांना पैशाची निकट आहे. मात्र चुकाने मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या उन्हाळी हंगामातील तब्बल २ लाख क्विंटल धानाचे सुमारे ३३ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावार शेतकऱ्यांना पैशाची निकट आहे. मात्र चुकाने मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
भंडारा धान उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सिंचनाच्या सोईमुळे येथील शेतकरी उन्हाळी धानपिक मोठ्या प्रमाणात घेतात. यावर्षी उन्हाळी हंगामात आतापर्यंत सुमारे २ लाख क्विंटल धान शेतकºयांनी शासकीय आधारभूत केंद्रावर विकला आहे. नियमानुसार त्यांना किमान आठ ते दहा दिवसात चुकारे मिळणे गरजेचे होते. परंतु शासनाकडून धानाचे पैसेच आले नाही. सुमारे ३३ कोटी रुपये चुकाºयाचे थकीत आहेत. शेतकºयांना आतापर्यंत एकही दमडी मिळाली नाही. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. शेतकºयांनी मशागतीची कामे सुरु केली आहे. धानाचे बीज खरेदी करणे तसेच इतर कामाकरिता शेतकºयांकडे पैसे नाही. सध्या आॅनलाईनचा काळ सुरु आहे तरी विलंब होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. धानाचे चुकारे अडल्याने खरीपातील धान पेरणीसाठी शेतकºयांना कर्ज काढावे लागत आहे. अनेक शेतकºयांना तर व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतकºयांचा तात्काळ पैसा द्यावा अशी मागणी आहे. रबी हंगामात धानाचा उतारा आला नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकाची शेतकºयांनी लागवड केली. शासनाने चुकारे थकीत ठेवले आहेत. त्या शेतकºयांना ताबडतोब चुकारे मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे. आता शेतकºयांना त्यांच्या घामाचे दाम कधी मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागतले आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन लाख क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली आहे. गुरुवारी शासनाकडून साडेचार कोटी प्राप्त झाले आहेत. गुरुवारी शासनाकडून साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. लवकरच धानाचे चुकारे शेतकºयांना करण्यात येतील. उर्वरित रक्कम शासनाकडून मिळणार आहे.
-गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा