३३ विद्यार्थ्यांच्या शाळा बहिष्काराला अखेर मिळाला न्याय

By admin | Published: August 26, 2016 12:33 AM2016-08-26T00:33:53+5:302016-08-26T00:33:53+5:30

जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गाला मान्यता मिळालीच पाहिजे यासाठी डांबेविरली येथील पालक व गावकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली.

33 school students finally got boycott | ३३ विद्यार्थ्यांच्या शाळा बहिष्काराला अखेर मिळाला न्याय

३३ विद्यार्थ्यांच्या शाळा बहिष्काराला अखेर मिळाला न्याय

Next

पालकांपुढे शिक्षण विभागाचे अधिकारी निरुत्तर : बाळा काशिवारांच्या मध्यस्थीने आज शाळेची घंटा वाजणार
लाखांदूर : जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गाला मान्यता मिळालीच पाहिजे यासाठी डांबेविरली येथील पालक व गावकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली. अखेर पालकांनी जिल्हा परीषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान निरुत्तर केल्याने आमदार बाळा काशिवार यांनी मध्यस्थी करून प्रश्न निकाली काढला. त्यामुळे या शाळेची घंटा आता पुन्हा वाजणार आहे.
लाखांदूर तालुक्यात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पालक व गावकऱ्यांचे आठवीकरिता आंदोलन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नाकीनऊ आणणारे ठरले. उशिरा का होईना अखेर आमदार बाळा काशीवार यांनी डांबेविरली येथे बैठक घेऊन प्रश्न निकाली काढला. सत्र सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आठवीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार डांबेविरली येथील शिक्षण समितीने तसा प्रस्ताव सादर करुन जिल्हा परिषदेकडे पाठवला. आज ना उद्या मान्यता येईल म्हणून गावातच आठवी सुरू करण्यात आला. पंचायत समिती शिक्षण विभागाकडून पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
खासगी शाळा गावातच असल्याने जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाने आठवा वर्ग बंद करण्याचे पत्र दिल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली. बुराडे हायस्कुल येथे भौतीक सुविधेचा अभाव, मैदान नाही. शाळेला आवश्यक इमारत नाही, त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करून जिल्हा परिषद शाळेला आठवीची मान्यता मिळाली पाहिजे म्हणून हेका धरत १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गुरूवारला आमदार बाळा काशिवार यांनी पालक, गावकरी, जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाचे अधिकारी, पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी यांची डांबेविरली येथे बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावकऱ्यांनी शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. यापूर्वी या प्रकरणाकडे शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने ते निरुत्तर झाले. हरिदास खोब्रागडे, सरपंच वासुदेव बुराडे, पं.स.सदस्य शिवाजी देशकर यांनी या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांनी निष्काळजी केल्याचा पाढा वाचला.
बुरडे हायस्कुलचे अध्यक्षांनी न्यायालयात दाद मागितल्याने आता जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग पालक व गावकऱ्यांची बाजू मांडून न्याय मागणीकरीता न्यायालयात दाद मागणार तसेच आठवीच्या त्या ३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश लाखांदूर जि.प. हास्यस्कुल येथे करून, ८ कि. मी. चा प्रवास पूर्ण करण्यासाठी आ.काशिवार स्वत: सायकल उपलब्ध करून देणार असल्याचे मान्य केले. त्यामुळे आता शाळेची घंटा पुन्हा वाजणार असून आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु जो पर्यंत जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभाग पालकांची मागणी रास्त समजून न्यायालयात दाद मागणार नाही, तो पर्यत विद्यार्थ्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र काढणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतल्याने लवकरात लवकर जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागाने न्यायालयात दाद मागण्याची पूर्व तयारी करण्याचे निर्देश आ. काशिवार यांनी दिले. यावेळी सरपंच वासुदेव बुराडे, जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, सभापती मंगला बागमारे, नूतन कांबळे, विनोद ठाकरे, विलास तिघरे, प्रकाश राऊत, पं. स. सदस्य अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, हरिदास खोब्रागडे, प्रदीप बुराडे, प्रमोद ढोरे, कल्लू रामटेके, दीपक बुराडे, तहसीलदार तोडसांम, खंडाविकास अधिकारी देवरे, तत्वराज अंबादे, शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, उपशिक्षणाधिकारी चोले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 33 school students finally got boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.