‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांना दोन्ही सत्राची परीक्षा देण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:09 AM2017-10-28T00:09:19+5:302017-10-28T00:09:30+5:30

स्थानिक समर्थ महाविद्यालयाने एमकॉमच्या ३३ विद्यार्थांना प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून वंचित ठेवले. त्यानंतर आमदार डॉ.परिणय फुके आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला.

The '33' students get the opportunity to test both sessions | ‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांना दोन्ही सत्राची परीक्षा देण्याची मुभा

‘त्या’ ३३ विद्यार्थ्यांना दोन्ही सत्राची परीक्षा देण्याची मुभा

googlenewsNext
ठळक मुद्देपरिणय फुके यांची मध्यस्थी : महाविद्यालयाला संलग्नित करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयाने एमकॉमच्या ३३ विद्यार्थांना प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून वंचित ठेवले. त्यानंतर आमदार डॉ.परिणय फुके आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.
समर्थ महाविद्यालयात ४१७ क्रमांकाचे परीक्षा केंद्र आहे. तिथे एमकॉमच्या ३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु २५ आॅक्टोबरला पहिला पेपर असताना विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयातून मिळाले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांना विचारले असता त्यांनी केंद्र संलग्नीकरण न झाल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगून प्रवेश रद्द करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून अर्ज लिहून मूळ कागदपत्रे परत घेण्यासाठी सांगितले.
दरम्यान खासदार नाना पटोले यांनी विद्यार्थ्यांही ही समस्या लक्षात घेऊन कुलगुरू काणे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशा सूचना केल्या. ही बाब विद्यार्थ्यांनी आमदार डॉ.परिणय फुके यांना सांगितली त्यांनी वेळीच दखल घेत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सांगितले. आणि शुक्रवारला नागपूर येथे विद्यापीठात कुलगुरू डॉ.काणे यांची आ.परिणय फुके, माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. समस्या ऐकून घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रात प्रथम सत्राची परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही असे सांगून परीक्षा केंद्र संलग्नित प्रक्रिया पूर्ण करण्याचे कुलगुरूंनी प्राचार्यांना सांगितले. या बैठकीत हर्षा जवंजाळ, पल्लवी पंधरे, मनीषा भानारकर, मेघा बांगडकर, अर्चना निमजे, श्रुती वासनिक, दीपक टेकाम, योगेश निखारे, विक्की बुंदेले असे ३२ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या बैठकीला प्राचार्य संजय पोहरकर उपस्थित नव्हते.

समर्थ महाविद्यालयातील ३२ विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले, असे कळताच मी कुलगुरूंना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी हे सांगितले. महाविद्यालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. आज विद्यापीठात कुलगुरू सोबत बैठकीत त्यावर तोडगा निघाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
-डॉ.परिणय फुके, आमदार, विधानपरिषद.
महाविद्यालयाच्या चुकीमुळे एमकॉमचे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयाला संलग्नीकरण प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या सत्रात प्रथम आणि द्वितीय सत्राची परीक्षा देण्याची मुभा देण्याचा निर्णय विद्यापीठात घेतला.
- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू,रा तू म विद्यापीठ, नागपूर.
महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, हे कळताच आम्ही संस्थेच्यावतीने संस्था प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीसाठी गेलो. माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात कुलगुरूंसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात आला.
- आल्हाद लाखनीकर, अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी

Web Title: The '33' students get the opportunity to test both sessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.