गारपिटीत ३५ जण जखमी

By admin | Published: April 7, 2016 12:24 AM2016-04-07T00:24:05+5:302016-04-07T00:24:05+5:30

मंगळवारी सायंकाळी अचानक वादळासह अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात हजेरी लावली.

35 people injured in hail | गारपिटीत ३५ जण जखमी

गारपिटीत ३५ जण जखमी

Next

गढपेंढरी येथे जनजीवन विस्कळीत : साकोलीत वादळ वाऱ्याने घराची छपरे उडाली
भंडारा : मंगळवारी सायंकाळी अचानक वादळासह अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे घरावरील कौले, टिन छत उडाली. कुठे झाडे उन्मळून तर कुठे विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. लाखनी तालुक्यातील गढमेंढरी येथे गारपीटीमुळे ३५ जण जखमी झाले. अवकाळी पावसाचा लाखनी, साकोली व पवनी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून शेत पिकांसह विट भट्ट्यांचे नुकसान झाले आहे.
लाखनी : गढपेंढरी येथे सुमारे एक तास गारपीट झाल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना गारांचा मार बसला. यात ३५ शेतकरी जखमी झाले. जखमींना पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यात १२० कौलारु घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे तुटली व विद्युत खांब वाकल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार एस.ए. घारगडे यांनी गढपेंढरी गाठली. घटनास्थळी सरपंच जिजा तुमडाम, पंचायत समिती सदस्य संजय डोळस, उपसरपंच जितेंद्र दोनोडे, यशवंत खेडीकर, पुरुषोत्तम गायधने, गजेंद्र अंडेल यांनी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
जखमींमध्ये किशोर गायधनी (३५), सिंधू गायधनी (३०), आशा गायधने (४०), गोमा गायधनी (४५), अर्चना गायधने (३५), राजीराम गायधने (४०), हेमलता गायधने (४०), दामिना गायधने (९), कामिनी गायधने (११), यामीना गायधने (७), साक्षी गायधने (६), भारत गायधने (४९), वरुण गायधने (३०), मंगलदास गायधने (४०), ललिता माहुरकर (३०), हेमराज माहुरकर (३५), देवनाथ गायधने (३५), ज्योती गायधने (३०), विष्णू गायधने (३०), अर्चना गायधने (२५), श्रीकृष्ण गायधने (७०), वसंत गायधने (३५), मिरा गायधने (५५), लिलावती गायधने (६५) आदींचा समावेश आहे. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ.नचिकेत पातुरकर यांनी औषधोपचार केले.
साकोलीत अकाली पाऊ स
साकोली : मंगळवारी सांयकाळी अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी विद्युत पोल पडले. यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या वीज पुरवठा खंडीत झाला. लाखांदूर मार्गावरील काही घरावरील टिनाचे छत उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील पोलीस स्टेशनलगतचे झाड कोसळून विजेचे तार तुटले. काही ठिकाणी रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत होता. साकोलीत ६.० मी.मी. एवढी पावसाची नोंद करण्यात आली. (लोकमत चमू)

Web Title: 35 people injured in hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.