येरली खासगी आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:46 AM2023-08-25T10:46:56+5:302023-08-25T10:47:04+5:30

उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

36 students of Yerli private ashram school poisoned by food; three students is in critical condition | येरली खासगी आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर

येरली खासगी आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर

googlenewsNext

तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्यातील येरली येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना गुरुवारी अन्नातून विषबाधा झाली. त्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून या सर्व विद्यार्थ्यांवर तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येरली येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत दुपारी १२:३० वाजता विद्यार्थ्यांना आलू, वाटाणा यांचे भोजन देण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सदर विद्यार्थ्यांना उलटी व भोवळ येणे सुरू झाले. विद्यार्थ्यांनी कामके नामक शिक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना संध्याकाळी ६:३० वाजता तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, इतर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

सदर प्रकरणाने पालकांत एकच खळबळ उडाली आहे. आदिवासी आश्रमशाळेत परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, माजी पंचायत समिती सदस्य प्रभाताई पेंदाम यांनी केली आहे.

या विद्यार्थ्यांना झाली विषबाधा

स्नेहा दुलीचंद पंधरे (१६), दीपिका वेंकट गजाम (१६), लक्ष्मी किंनाराम वरखडे (१६), साक्षी ओमप्रकाश टेकाम (१५), रुक्मिणी अमरसिंह उईके (१६), सुहाती अमरसिंग उईके (१३), अक्षय धर्मराज मरस कोल्हे (१६), सुष्मिता सुखदेव सर्याम (१६), नंदती विनोद उईके (११), शांती अजय पंधरे (१४), माधुरी मनोहर धुर्वे (१६), जानवी शिवदास वरखडे (१३), बाळकृष्ण इनवाते (११), गायत्री लक्ष्मण परते (१७), रोशनी अशोक शिरसाम (१४), सुचिता सर याम (१३), संजना उईके (१३), सिद्धेश्वर कळपती (१६), प्रिया उई के(१६), पावनी पंध रे (१२), किरण मरस्कोले (१७), वैभवी पेंदा म (१२), मीनाक्षी भोयर (१३), अंजली भलावी (१४), सलोनी अडमाचे (१६) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: 36 students of Yerli private ashram school poisoned by food; three students is in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.