३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 09:30 PM2019-02-17T21:30:08+5:302019-02-17T21:30:26+5:30

इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता ...

36,319 students test results | ३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

३६,३१९ विद्यार्थ्यांची कसोटी पणाला

Next
ठळक मुद्देपरिक्षा बारावी व दहावीची: शिक्षण विभागाची तयारी पूर्ण, जिल्ह्यात दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत यंदा जिल्ह्यातून ३६ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परिक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे. विद्यार्थी दशेतील टर्निंग पॉर्इंट म्हणून समजली जाणाऱ्या या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचा कस पणाला लागला आहे. परिक्षा म्हटले म्हणजे अभ्यासाचे टेन्शन वाढत जाते. अशा स्थितीत पालकांसह शिक्षकगण व मार्गदर्शक विद्यार्थ्यांना अभ्यासाप्रती प्रोत्साहीत करीत असतात. मंडळाने काही महिन्यांपूर्वी बारावी व दहावी परिक्षेचे वेळापत्रक घोषित केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नियोजनही सुरु होते. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात होणार असून यावर्षी जिल्ह्यातून १८ हजार ५७९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ६१ परिक्षा केंद्रामधून विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यात विशेष म्हणजे बारावीचे सर्वाधिक परिक्षार्थी भंडारा तालुक्यातून आहेत. बारावी परिक्षेचा शेवटचा पेपर २० मार्च रोजी आहे. दहावीची परिक्षा १ मार्च पासून सुरु होणार असून यात १७ हजार ७४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन परिक्षा केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात सदर दोन्ही केंद्र मोहाडी तालुक्यातील असून १२ वीचे केंद्र म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव व दहावीचे केंद्र असलेल्या कान्हळगाव येथील नवप्रभात हायस्कूलचा समावेश आहे. दहावीची परिक्षा २२ मार्च रोजी संपणार आहे. परिक्षेसाठी शिक्षण विभागाची पुर्ण तयारी झाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठीही शिक्षण विभागाने चांगलाच भर दिला आहे.

Web Title: 36,319 students test results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.