३७ हजार व्यक्तींचा कोरोनावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:38+5:302021-04-29T04:27:38+5:30

भंडारा : कोरोना संसर्गाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना गत काही दिवसांत दिलासा मिळत असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ...

37,000 people conquered Corona | ३७ हजार व्यक्तींचा कोरोनावर विजय

३७ हजार व्यक्तींचा कोरोनावर विजय

googlenewsNext

भंडारा : कोरोना संसर्गाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना गत काही दिवसांत दिलासा मिळत असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता घटू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ३६ हजार ९८६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ठणठणीत बरे झाले आहेत. दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. त्यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दररोज हजार ते १२०० रुग्ण आढळून येत होते, तर सरासरी १० ते १२ जणांचा कोरोनाने मृत्यू होत होता. रुग्णसंख्या कायम असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गत आठ दिवसांत वाढल्याचे दिसत आहे. दररोज सुमारे १२०० ते १५०० रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २५ हजार ६३२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४८ हजार ५६३ व्यक्ती बाधित आढळून आली. त्यापैकी ३६ हजार ९८६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सर्वाधिक कोरोनामुक्त व्यक्ती भंडारा तालुक्यात आहेत. १५ हजार ६०९ जणांनी कोरोनावर मात केली. मोहाडी तालुक्यातील ३०७१, तुमसर ४५८३, पवनी ४३२४, लाखनी १०१८, साकोली ३४८२, लाखांदूर १८९९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्णांनी होम आयसोलेशनमध्येच डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेऊन कोरोनावर मात केली आहे, तर काही रुग्णांनी कोविड केअर सेंटर व काही रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, बुधवारी १२८३ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा तालुक्यातील ४५३, मोहाडी ८४, तुमसर ११५, पवनी १४२, लाखनी १२०, साकोली ३२७, लाखांदूर ४२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी १२१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बुधवारी २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यात १०, मोहाडी ६, पवनी २, लाखनी ५, साकोली २ आणि लाखांदूर तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७८३ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.१६ टक्के असून, मृत्यूदर १.६१ टक्के आहे. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. विविध सामाजिक संस्थांनीही या लसीकरण मोहिमेसाठी आता पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या मदतीने लसीकरण केले जात आहे.

जिल्ह्यात १० हजार ७९४ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार ७९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये भंडारा तालुक्यात ५१३३, मोहाडी ६४८, तुमसर १३५४, पवनी ७६१, लाखनी १२१८, साकोली १२२१ आणि लाखांदूर तालुक्यात ४५९ व्यक्तींचा समावेश आहे. यातील अनेक जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ५६३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात भंडारा तालुक्यातील २१ हजार १२८, मोहाडी ३७९२, तुमसर ६०२४, पवनी ५१६८, लाखनी ५२९२, साकोली ४७६४ आणि लाखांदूर तालुक्यातील २३९५ रुग्णांचा समावेश आहे. मात्र, त्यापैकी ३६ हजार ९८६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच लसीकरणासाठीही मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वाधिक मृत्यू भंडाऱ्यात

जिल्ह्यात आतापर्यंत ७८३ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील ३८६ जणांचा समावेश आहे. मोहाडी तालुक्यात ७३, तुमसर ८७, पवनी ८३, लाखनी ५६, साकोली ६१ आणि लाखांदूर तालुक्यातील ३७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.६१ टक्के असून, सर्वाधिक मृत्यूदर मोहाडी तालुक्यात १.९३ तर सर्वांत कमी लाखनी तालुक्यात आहे.

Web Title: 37,000 people conquered Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.