कोरोनाचे जिल्ह्यात ३९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:08+5:30
तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातलस सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात १२९, साकोली ५९, लाखांदूर २२, तुमसर ६८, मोहाडी ५९, पवनी ३३ तर लाखनी तालुक्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ३९ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १२, साकोली व पवनी तालुक्यात प्रत्येकी एक, तुमसर चार, लाखनी दोन तर आज सर्वाधिक रुग्ण मोहाडी तालुक्यात आढळले असून त्यांची संख्या १९ इतकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने आता परिस्थिती गंभीर केली आहे. शनिवारी १८ रुग्ण बाधीत आढळल्यानंतर रविवारी तब्बल ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असला तरी संसर्ग बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातलस सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात दिसून येत आहे. आतापर्यंत भंडारा तालुक्यात १२९, साकोली ५९, लाखांदूर २२, तुमसर ६८, मोहाडी ५९, पवनी ३३ तर लाखनी तालुक्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या ३९ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १२, साकोली व पवनी तालुक्यात प्रत्येकी एक, तुमसर चार, लाखनी दोन तर आज सर्वाधिक रुग्ण मोहाडी तालुक्यात आढळले असून त्यांची संख्या १९ इतकी आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार व रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लक्ष १३ हजार १५९ नागरिकांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्याचा उपयोग केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ९०७३ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे. आजघडीला १६१ व्यक्ती पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचारसुरु आहे.
आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून ८२० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. या वॉर्डात आता १५६ व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात अॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे २४८२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत ४८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४३४ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. फल्यू ओपीडीअंतर्गत १७७ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे.
ग्रामीण क्षेत्रात वाढली रुग्णसंख्या
परजिल्ह्यासह अन्य राज्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. यातही ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढतीवर आहे. रविवारी आढळून आलेल्या एकुण रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात १२ रुग्ण संख्येपैकी १० पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. यापैकी काही व्यक्ती उतराखंड, गुजरात येथून आले आहेत. तुमसर तालुक्यात आढळलेले चारही व्यक्ती पुरुष असून यापैकी एक व्यक्ती नागपूर येथून आला आहे. मोहाडी तालुक्यात १९ पैकी १७ पुरुषांचा समावेश असून एका २६ वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. साकोली तालुक्यात पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती २६ वर्षीय असून तो पुणे येथून आला आहे. पवनी येथे ३५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधीत आढळला. लाखनी तालुक्यात दोन पैकी एक ७५ वर्षीय महिला असून दुसरा व्यक्ती ४५ वर्षीय पुरुष आहे.
२४३ रुग्णांना मिळाली सुटी
२७ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत एकुण रुग्ण संख्या ४०९ इतकी झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ३००च्या घरात असलेल्या या संख्येने सहा दिवसांच्या कालावधीत चारशेचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत २४३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.