४० विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:17 AM2018-01-28T00:17:24+5:302018-01-28T00:17:43+5:30
प्रजासत्ताकदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दुधातून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
आॅनलाईन लोकमत
साकोली : प्रजासत्ताकदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दुधातून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ही घटना साकोली तालुक्यातील सुकळी (महालगाल) येथे घडली.
साकोली तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर गावकºयांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप करण्यात आले. हे दूध प्याल्यानंतर विद्यार्थ्यांनी ओकाºया केल्या. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना साकोली उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचारानंतर सर्वांची सुटी करण्यात आली. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.