रोहयोतून लाखनीत ४२ लाख ३० हजार मनुष्य दिवस रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:25 AM2021-02-19T04:25:01+5:302021-02-19T04:25:01+5:30

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने शासनाने महाराष्ट्र ग्रामीण ...

42 lakh 30 thousand man days employment in Rohio | रोहयोतून लाखनीत ४२ लाख ३० हजार मनुष्य दिवस रोजगार

रोहयोतून लाखनीत ४२ लाख ३० हजार मनुष्य दिवस रोजगार

Next

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती केली आहे. या योजनेच्या केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्याने नियोजन देखरेख व संनियंत्रण ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या मदतीस ग्राम रोजगारसेवक देण्यात आला असून निवडीचे अधिकार ग्रामसभेला आहेत. पंचायत समिती स्तरावर याकरिता स्वतंत्र विभाग असून तांत्रिक मंजुरी संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तर १५ लाख रुपयांपर्यंत प्रशासकीय मजुरीचे अधिकार गट विकास अधिकारी यांना दिलेले आहे.

साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. १ नगरपंचायत आणि ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून लोकसंख्या १लाख २८ हजार ७४० आहे. कुटुंब संख्या २५ हजार ४९९ तर दारिद्र रेषेखालील कुटुंबे १७ हजार १४० आणि मजूर संख्या ६६ हजार ३६९ आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभांशच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. जलसंवर्धन कार्यक्रमांतर्गत बोडी खोलीकरण ४२ कामे २१० लाख रुपये, तलाव खोलीकरण १५९ कामे ७९५ लाख रुपये, नाला सरळीकरण २०७ कामे १०३५ लाख रुपये, पाट दुरुस्‍ती व कालव्यातील गाळ काढणे ७९ कामे ३९५ लाख रुपये, कूषीतर कामे अंगणवाडी बांधकाम ३५ कामे १०५ लाख रुपये, स्मशान भूमी सपाटीकरण व सौंदर्यीकरण ७१ कामे ३५५ लाख रुपये, शाळेचे क्रीडांगण व मैदान सपाटीकरण ५९ कामे १७७ लाख रुपये, सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवड २१३ कामे ७३९ लाख रुपये, फळबाग लागवड ७१ कामे १०६ लाख रुपये, वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत सिंचन विहीर बांधकाम १०३१ कामे ३०९३ लाख रुपये, भूसुधार मजगीची ७९९ कामे ३२० लाख रुपये, पांदण रस्ते , सिमेंट रस्ते व मोरी बांधकाम ७०१ कामे ५२९५ लाख रुपये, याशिवाय केंद्राने ठरविलेली इतर कामे यामध्ये कुक्कुट पालन शेड ९९८ कामे ७२८ रुपये, शेळी पालन शेड ७१९ कामे ४८२ लाख रुपये, कटल शेड ११०७ कामे ९१३ लाख रुपये, शोष खड्डे १९९७ कामे ५६ लाख रुपये, विहीर पुनर्भरण २८७ कामे ५५ लाख रुपये, नाॅपेड टाकी ६१३ कामे १२३ लाख रुपये, गांडूळ खत १९३ कामे २९ लाख रुपये,शौंचालय बांधकाम १९०८ कामे २२९ लाख रुपये, मत्स्व पालन टाकी ३८ कामे ३८० लाख रुपये, राजीव गांधी भवन ७ कामे ७० लाख रुपये, घरकुल बांधकाम १७३५ कामे ३२२ लाख रुपये, शेततळे ८३कामे ५८ लाख रुपये, इतर ९ लाख रुपये असे एकूण १३ हजार २३० कामे नियोजनात समाविष्ट करण्यात आले असून यावर अपेक्षित खर्च १६ हजार ३२३ लाख रुपये खर्च असून यापासून ४२ लाख ३० हजार ४०० मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.

Web Title: 42 lakh 30 thousand man days employment in Rohio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.