४२ गावांची मदार २० पोलीसदादांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:05+5:30
यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ४२ गावे येतात. पवनी, शिरूड, धोत्रा, एकुर्ली, कानगाव, अलमडोह, येरणवाडी, टाकळी, नांदगाव, भगवा व अन्य गावांचा समावेश आहे. ठाण्याकरिता तीस कर्मचारी मंजूर असताना केवळ वीस पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.
यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुºया कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून कर्तव्य बजावावे लागते. कामाच्या ताणामुळे त्यांची प्रचंड दमछाक होत असून याचाच परिणाम गावासह परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण तीन बीट आहेत. तळेगाव, कानगाव, अल्लीपूर ही मोठी गावे असून जमादारांना त्या-त्या बीटची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन गावांकरिता केवळ सहा पोलीस कर्मचारी आहेत.
गावासह परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ आहे. मात्र, अपुºया असलेल्या कर्मचाºयांना याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी केवळ एक ते दोन कर्मचारी गस्तीवर असतात. मोठी घटना घडली तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे या कर्मचाºयांना शक्य नाही. याकरिता ठाण्यात पुरेसा कर्मचारीवर्ग गरजेचा आहे. अल्लीपूर हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असुन संवेदनशील म्हणून या गावाची पोलीस विभागात नोंद आहे. याकरिता येथे पुरेसे पोलीस कर्मचारी देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कामाच्या ताणामुळे कौटुंबिक सोहळ्यातही अनुपस्थिती
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. याकरिता हा विभाग मनुष्यबळाने परिपूर्ण असे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठाण्यात अपुरा पोलीस कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो. यामुळे पोलिसांना कौटुंबिक सोहळ्यातही सहभागी होता येत नाही. पुरेसा पोलीस कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
अल्लीपूर आणि परिसराची लोकसंख्या मोठी आहे. मात्र, ठाण्यात अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. वरिष्ठांना याबाबत कळविले असून पोलीस कर्मचाºयांची मागणी केली आहे.
- योगेश कामाले, ठाणेदार अल्लीपूर