चार नगरपंचायतीसाठी ४२१ नामांकन

By admin | Published: October 9, 2015 01:09 AM2015-10-09T01:09:24+5:302015-10-09T01:09:24+5:30

जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी या चार नगर पंचायत निवडणुकीसाठी आज गुरुवारला नामांकन दाखल करण्याच्या ...

421 nominations for four municipal councils | चार नगरपंचायतीसाठी ४२१ नामांकन

चार नगरपंचायतीसाठी ४२१ नामांकन

Next

भंडारा : जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी या चार नगर पंचायत निवडणुकीसाठी आज गुरुवारला नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी ४२१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यात मोहाडीत १०८, साकोलीत ८१, लाखनीत १०५ तर लाखांदुरात १२७ नामांकनाचा समावेश आहे. नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या चारही ठिकाणी गर्दी दिसून आली.
मोहाडीत सर्वच पक्षाचे उमेदवार ठरले
मोहाडी : नगर पंचायत मोहाडीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे या पक्षाने अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या पक्षांनी सर्वच १७ प्रभागात उमेदवार दिले आहे. शिवसेना १० प्रभागात तर मनसे पाच प्रभागात निवडणूक लढत आहे. याशिवाय स्थानिक संघटना उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. त्याशिवाय असंतुष्ट कार्यकर्तेही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येणार आहे. एकूण १०८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत.
लाखांदुरात १२७ नामांकन दाखल
लाखांदूर : नगरपंचात निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या चारही राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उभे केले आहे. १७ प्रभागांसाठी नावे निश्चित केली आहेत. या निवडणुकीकसाठी एकूण १२७ नामांकन दाखल झाले आहेत. १७ प्रभागासाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजप १७, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १७, काँग्रेस १७ तर शिवसेनेकडून १० एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. लाखांदुरातही ही निवडणूक ताब्यात घेण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आखणी केली आहे.
लाखनीत नगराध्यक्ष पदासाठी घोडदौड
लाखनी : नगरपंचात निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या चारही राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात उभे केले आहे. १७ प्रभागांसाठी नावे निश्चित केली असून ज्या वॉर्डात एकापेक्षा जास्त दावेदार आहेत.
त्याठिकाणी निवड बाकी आहे. नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नाही. यामुळे लाखनी नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष बनण्यासाठी अनेकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यात ग्रामपंचायतचे अनुभवी राजकारणी आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवडणूक लढू पाहत आहेत.
लाखनी नगर पंचायतमध्ये १०,२९४ मतदार मतदान करणार आहेत. यात ५१३१ पुरुष मतदार आहेत तर ५१६३ स्त्री मतदार आहेत. १७ प्रभागातील मतदार संख्या मर्यादित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 421 nominations for four municipal councils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.