४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:21 PM2017-08-14T22:21:20+5:302017-08-14T22:22:11+5:30
राज्य शासनाने छत्रपत्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यातील ४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती ....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने छत्रपत्री शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यातील ४२,६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदे दिली.
यावेळी आ.वाघमारे म्हणाले, जिल्ह्यात ६२ हजार शेतकºयांनी कर्ज घेतले होते. १ लाख ५६ हजार शेतकºयांनी कर्ज घेतले नव्हते. यापैकी दीड लाख रूपयांच्यावर २,४०० शेतकºयांनी कर्ज घेतले होते. यात १,८३१ शेतकºयांनी पीक कर्ज तर ५६९ शेतकºयांनी मध्यम मुदती कर्ज घेतले होते. तर दीड लाख रूपयापर्यंत १६ हजार ५६६ शेतकºयांनी पीक कर्ज तर ७ हजार ६३६ शेतकºयांनी मध्यम मुदती कर्ज घेतले होते. नियमित पीक कर्ज भरणाºया शेतकºयांची संख्या ५४ हजार २०२ असून मध्यम मुदती कर्ज भरणाºयांची संख्या ४५९ ईतकी आहे.
कर्जाचे पुनर्गगठण २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात कर्ज घेणाºया शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
२५ टक्के पात्र निकषात ५४ हजार ६६१ शेतकºयांचा समावेश राहणार आहे. यापैकी ४२ हजार ६७२ शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून ९७ हजार ३३३ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. १० हजार रूपयापर्यंतचे १३१ शेतकºयांना १३ लाख १० हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आॅनलाईन पिक विमा काढताना शेतकºयांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रक्रियेदरम्यान शेतकºयांना कुणी पैशाची मागणी करीत असेल तर त्यांनी लगतच्या पोलीस ठाण्यात किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही आ.चरण वाघमारे यांनी यावेळी केले आहे.
पाऊस असमाधानकारक
भंडारा जिल्ह्यात १५ आॅगस्टपर्यंत पाऊस असमाधानकारक बरसला असून शेतकºयांची रोवणी अद्याप झालेली नाही. भंडारा तालुक्यात ४१ टक्के, मोहाडीत २७ टक्के, तुमसर ४१ टक्के, पवनी ५९ टक्के, लाखांदूर ६९ टक्के, लाखनी ५९ टक्के तर साकोली तालुक्यात ५९ टक्के रोवणी झाली आहे.