विदेशातून ४३ व्यक्ती दाखल, कुणालाही संसर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:00:53+5:30
भंडारा जिल्ह्यात अबुधाबी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, टान्झानिया, स्विडन या देशांतून ही मंडळी दाखल झाली आहेत. आफ्रिका खंडात या व्हेरिएंटचा संसर्ग पुढे आल्याने तेथून आलेल्यांवर करडी नजर आहे. टान्झानिया येथून एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाली असून, ती हायरिस्क देशातून आली असल्याने त्याच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून, भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून ४३ व्यक्ती विविध देशांतून दाखल झाल्या आहेत. यापैकी १३ व्यक्ती परत परदेशात गेल्या होत्या. सहा व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता ते निगेटिव्ह आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात अबुधाबी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, टान्झानिया, स्विडन या देशांतून ही मंडळी दाखल झाली आहेत. आफ्रिका खंडात या व्हेरिएंटचा संसर्ग पुढे आल्याने तेथून आलेल्यांवर करडी नजर आहे. टान्झानिया येथून एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाली असून, ती हायरिस्क देशातून आली असल्याने त्याच्यावर प्रशासनाची करडी नजर आहे.
शहरात एक, ग्रामीणमध्ये ४२
- जिल्ह्यात परदेशातून दाखल झालेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती शहरी असून उर्वरित सर्व ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा या सर्वांवर नजर ठेवून आहे. कुणालाही संसर्ग नसल्याचे आढळून आले.
सहा जणांची टेस्ट, सर्व निगेटिव्ह
- परदेशातून दाखल झालेल्या ४३ पैकी सहा व्यक्तींचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सहाही व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हायरिस्क देशांतून एक व्यक्ती दाखल
- हायरिक्स असलेल्या ऑफ्रीका खंडातील टांझानिया देशातून एक व्यक्ती भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. त्याचा नमूना तपासणीसाठी पाठविला असता तो निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
खबरदारीच्या उपाययोजना
- ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. नागरिकांना मास्क सक्तीचा करण्यात आला असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश दिले. आहे.
- प्रवासात कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या व्यक्तींना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच प्रवासातही मास्क सक्तीचा करण्यात आला आहे.
- बाजारपेठेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे.
विमानतळावर चाचणी झाली पुढे काय?
- परदेशातून आलेल्या व्यक्तींची विमानतळावर चाचणी केली जाते. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झाल्यावर आरोग्य विभागही त्यांच्यावर करडी नजर ठेवून
- भंडारा जिल्ह्यात तुमसरमध्ये तीन आणि मोहाडी तालुक्यात एक असे चार व्यक्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अबूधाबीवरून दाखल झाले. ते सर्व निगेटिव्ह आहे.