४,३५५ उमेदवार टीईटी परीक्षा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:40 AM2017-07-21T00:40:59+5:302017-07-21T00:40:59+5:30

भंडारा शहरातील २० परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून या

4,355 candidates will be given the TET examination | ४,३५५ उमेदवार टीईटी परीक्षा देणार

४,३५५ उमेदवार टीईटी परीक्षा देणार

Next

२२ जुलैला परीक्षा : गैरप्रकार आढळल्यास कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरातील २० परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून या परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार आढळल्यास सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात भरारी पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकाद्वारे परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्यात येणार आहेत. आजच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, अधिक्षक वरुण शहारे, प्रभारी शिक्षणाधिकारी मोहन चोले व परीक्षा केंद्र प्रमुख उपस्थित होते.
२२ जुलै रोजी पेपर-१ साठी १२ परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० ते १.०० व पेपर-२ साठी ८ परीक्षा केंद्रावर दुपारी २.०० ते ४.३० या कालावधीत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. पेपर-१ साठी २ हजार ६०९ परीक्षार्थी असून पेपर-२ साठी १ हजार ७४६ असे एकूण चार हजार ३५५ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा येथे उर्दु परीक्षा केंद्र असून महेंद्र ज्युनिअर कॉलेज बेला येथे इंग्रजी माध्यमाचे परीक्षा केंद्र आहे. उर्वरित सर्व केंद्रावर मराठी माध्यमातून परीक्षा होणार आहे. आठवले समाजकार्य महाविद्यालय वरठी रोड भंडारा, लालबहादुर शास्त्री विद्यालय शास्त्री चौक भंडारा, जकातदार विद्यालय भंडारा, नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा, बन्सीलाल लाहोटी नुतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा, नुतन कन्या शाळा भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, रेवाबेन पटेल महाविद्यालय भंडारा, महर्षि विद्या मंदिर उमरी भंडारा, महेंद्र ज्युनिअर कॉलेज बेला भंडारा, रॉयल पब्लीक स्कुल भंडारा व सेंट पिटर्स स्कुल बेला या बारा केंद्रावर पेपर-१ होणार आहे. तर लालबहादुर शास्त्री विद्यालय भंडारा, जकातदार विद्यालय भंडारा, नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, रेवाबेन पटेल महाविद्यालय भंडारा, महर्षि विद्या मंदिर उमरी भंडारा, महेंद्र ज्युनिअर कॉलेज बेला भंडारा, रॉयल पब्लीक स्कुल भंडारा व सेंट पिटर्स स्कुल बेला या केंद्रावर दुपारी २ ते ४.३० या वेळात पेपर-२ होणार आहे.
परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, कॅमेरा, डिजीटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे ईलेक्ट्रानिक्स साहित्य तसेच पुस्तके वहया पेन, घेवून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Web Title: 4,355 candidates will be given the TET examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.