सहा वाहनांतून ४४ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:06+5:302021-03-23T04:38:06+5:30
भंडारा जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक हाेत असल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांना मिळाली. त्यावरून त्यांनी ...
भंडारा जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक हाेत असल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांना मिळाली. त्यावरून त्यांनी वेगवेगळे पथक तयार करून एलसीबीचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावरून रविवारी रात्री वरठी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी सहा बाेलेराे पिकअप वाहन एकापाठाेपाठ येताना दिसले. या सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये ४४ जनावरे आढळून आली. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांची गाेशाळेत रवानगी करण्यात आली. यावेळी साेहेब मुकीम बेग (२२), अहेबाज निशार खान (२६), क्रिष्णा रामप्रसाद पंधरे (३०, तिघे रा. चंगेरा जि. गाेंदिया), अरविंद दादू भाेयर (२३, रा. खापाटाेली, ता. तुमसर), सचिन अमरसिंह सावत (२३, रा. खापा, जि. गाेंदिया), किसन रामदास कावरे (२५, रा. काटी, जि. गाेंदिया) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध वरठी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पाेलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, हवालदार रवींद्र बाेरकर, धर्मेंद्र बाेरकर, कैलास पटाेले, राजू दाेनाेडे, प्रशांत कुरंजेकर, किशाेर मेश्राम, संदीप भानारकर, सचिन देशमुख, काैशिक, गजभिये, शैलेश बेदुरकर, चालक तिवाडे यांनी केली.