Bhandara : भंडारा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी ४४९ नामांकन दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:34 PM2023-04-03T22:34:34+5:302023-04-03T22:34:43+5:30
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामांकन दाखल करण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती.
भंडारा : जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामांकन दाखल करण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती. उमेदवारांना दि. २७ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करण्याचे होते. शेवटच्या दिवसापर्यंत तुमसर बाजार समितीसाठी १३६, भंडारा ७६, पवनी ८९, लाखनी ९२, तर लाखांदूर बाजार समितीत ६२ नामांकन दाखल झाले. नामांकनाच्या बाबतीत तुमसर अव्वल राहिले. द्वितीय लाखनी, तर पवनी तृतीयस्थानी राहिली.
जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी १८ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. नामांकनाच्या शेवटच्या दिवशी साेमवारला सर्वाधिक नामांकन दाखल झाले. सोमवारला तुमसर बाजार समितीसाठी सर्वाधिक ११२ नामांकन दाखल झाले. भंडारा ५२, पवनी ७०, लाखनी ७७ व लाखांदूर बाजार समितीसाठी ६१ नामांकन दाखल झाले.
सर्वांत कमी नामांकन लाखांदुरात
लाखांदूर येथील बाजार समितीसाठी अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सर्वात कमी नामांकन दाखल झाले. विशेष म्हणजे सुरुवातीच्या तीन दिवसांत एकही नामांकन दाखल झाले नाही. शुक्रवारला केवळ एक नामांकन झाले. त्यानंतर दोन दिवस शासकीय सुटी असल्याने सोमवारला सर्वाधिक ६१, असे एकूण ६२ नामांकन दाखल झाले.
बॉक्स
दोन दिवस एकही नामांकन नाही
जिल्ह्यात पाचही बाजार समित्यांसाठी दि. २७ मार्चपासून नामांकन सुरू झाले. परंतु दि. २७ व २८ मार्चपर्यंत एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही. उमेदवार निवडीच्या भानगडीत दोन दिवस एकही गटाने नामांकन दाखल केले नसल्याचे सांगितले जाते.
मतदारसंघनिहाय नामांकन
बाजार समिती सहकारी संस्था ग्रामपंचायत व्यापारी, अडते हमाल, मापारी
तुमसर ८७ ३२ १४ ०३
भंडारा ४८ १८ ०७ ०३
पवनी ५३ २६ ०७ ०३
लाखनी ५० २९ १० ०३
लाखांदूर ३३ १८ ०८ ०३