जिल्ह्यात ४७ हजार बांधकाम मजुरांना मिळणार दीड हजार रुपये शासनाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:28+5:302021-04-19T04:32:28+5:30
कोट रोज उठायचे आणि आपल्या रोजीसाठी बाहेर पळायचे. आता कामही बंद झाले. त्यामुळे शासन काय देते आणि काय देत ...
कोट
रोज उठायचे आणि आपल्या रोजीसाठी बाहेर पळायचे. आता कामही बंद झाले. त्यामुळे शासन काय देते आणि काय देत नाही याची आम्हाला माहितीच होत नाही. कामगार आयुक्त कार्यालयाने अशा योजनांची माहिती कामगारांना दिली पाहिजे.
आकाश मोरे, कामगार
कोट
बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत. मात्र, योजनाची माहितीच होत नसल्याने आम्हाला याचा लाभ मिळत नाही. कार्यालयात जातो पण कर्मचारी अनेकदा व्यवस्थित माहिती देत नाहीत.
वंदना वैद्य, महिला कामगार
कोट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी करण्याचा निर्णय घेतानाच बांधकाम कामगारांचाही विचार केला. मात्र, आता कार्यालयाकडून १५०० रुपयांची मदत कधी मिळते हे माहीत नाही, ती लवकर मिळावी, अशी आमची मागणी आहे.
रोहित सेलोकर, बांधकाम कामगार.
बॉक्स
शासनाच्या योजनांची प्रचार, प्रसिद्धीच होत नाही
अनेकदा शासन बांधकाम कामगार मजुरांसाठी विविध योजना राबविते. मात्र, या योजनांची प्रत्यक्षात प्रचारप्रसिद्धी होत नसल्याने अनेकदा आम्हाला याचा वेळेत लाभ मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया बांधकाम कामगारांनी दिल्या. कार्यालयाने स्थानिक पातळीवर प्रचार, प्रसिद्धी करण्याची मागणीही यानिमित्ताने होत आहे.