भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी ४९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली १५५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:22 PM2020-07-09T18:22:00+5:302020-07-09T18:22:19+5:30
भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात सर्वाधिक २७ रुग्ण साकोली तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाबांधीतांची संख्या आता १५५ वर पोहोचली आहे.
राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्यामोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण एकाचदिवशी आढळून आले. साकोली तालुक्यात गुरुवारी २७ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर भंडारा तालुक्यात चार, तुमसर सहा, पवनी एक आणि लाखनी तालुक्यात अकरा रुग्ण आढळून आले. साकोली येथे रुग्णांची संख्या आता ४९ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ४९२९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४६२२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १५२ अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.