शासकीय नर्सिंग होस्टेलच्या ४९ विद्यार्थीनी एकाचवेळी आजारी, विषबाधेचा संशय

By युवराज गोमास | Published: December 9, 2023 04:01 PM2023-12-09T16:01:53+5:302023-12-09T16:07:33+5:30

शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

49 students of Government Nursing Hostel sick at the same time, suspected of poisoning | शासकीय नर्सिंग होस्टेलच्या ४९ विद्यार्थीनी एकाचवेळी आजारी, विषबाधेचा संशय

शासकीय नर्सिंग होस्टेलच्या ४९ विद्यार्थीनी एकाचवेळी आजारी, विषबाधेचा संशय

भंडारा : शहरातील शासकीय नर्सिेग होस्टेलमधील ४९ विद्यार्थीनींना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. शनिवारला दुपारपर्यंत यातील ४७ विद्यार्थीनींना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, सात विद्यार्थीनी अद्यापही उपचारार्थ दाखल आहेत.

दुषीत अन्न व पाण्यातून विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.भंडारा शहरातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निवासस्थानाशेजारी शासकीय नर्सिेग होस्टेल आहे. यामध्ये 'जीएनएम व एएनम' चे शिक्षण घेत असलेल्या मुली राहतात. होस्टेमध्ये राहण्याची शासकीय सुविधा आहे. मात्र, भाजीपाला खरेदी व भोजन बनविण्याचे काम मुलीच करीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. शुक्रवारला दुपारच्या सुमारास होस्टेलमधील दोघींची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर होस्टेलमधील अन्य मुलींची विचारणा केली असता मुलींनी ताप, सर्दी, पोट फुगणे, डोके दुखणे, थंडी लागून ताप, उलटी, चक्कर येणे, मळमळ वाटणे आदी लक्षणे सांगितल्याने तब्बल ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, एकाचवेळी ४९ विदयार्थीनींना त्रास जाणवू लागल्याने पाणी अथवा अन्न विषबाधेच्या चर्चेला उधाण आले आहे.

भरती असलेल्या विद्यार्थीनी

जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारला सायंकाळपर्यंत ४९ विद्यार्थीनींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारला सकाळपर्यंत यातील ४२ जणींना सुट्टी देण्यात आली. तर भरती असलेल्या विद्यार्थीनींमध्ये प्राची कुंभरे, ऐश्वर्या मेश्राम, रश्मी झंझाड, प्राची पडोळे, तनुषी खोब्रागडे, रिता मते यांचा समावेश आहे.

पालकांची वाढली चिंता

मुलींच्या तबीयतीची माहिती प्रशासनाचेवतीने मुलींच्या पालकांना वेळीच देण्यात आली. पालक दवाखान्यात हजर झाले. मुलींच्या उपचारावर त्यांचे बारीक लक्ष आहे. मुलींच्या तबीयतीची काळजी घेत आहे. परंतु, एकाचवेळी ऐवढ्या मुली आजारी का पडल्या यांचे उत्तर त्यांचेकडे नाही. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहे. पालक भरती असलेल्या विद्यार्थीनींच्या सेवेत हजर आहेत.

विषबाधेचा हा प्रकार नाही. सुरूवातीस दोघींची प्रकृती बिघडल्याने उपचार करण्यात आले. त्यानंतर तबियत चांगली नसल्याचे सांगितल्याने ४७ विद्यार्थीनींना तपासणीसाठी भरती केले हाेते. रात्रभर काळजी घेण्यात आली. सकाळी प्रकृतीत सुधारणा होताच व रिपोर्ट निगेटिव्ह येताच ४२ जणींना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सात जणींवर उपचार सुरू आहेत. सर्व लवकरच बऱ्या होतील. होस्टेलमध्ये केवळ राहण्याची सुविधा आहे. विद्यार्थी स्वत: भाजीपाला आणतात व शिजविता. एकाचवेळी सर्वांची प्रकृती बिघडलेली नाही. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा.

Web Title: 49 students of Government Nursing Hostel sick at the same time, suspected of poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.