५० टक्के उपस्थिती शासन आदेशाचे शासकीय कार्यालयांकडून सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:16+5:302021-03-24T04:33:16+5:30

एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच मार्च एंडिंगच्या पूर्वी निधी खर्च झाला ...

50% attendance Violation of government order by government offices | ५० टक्के उपस्थिती शासन आदेशाचे शासकीय कार्यालयांकडून सर्रास उल्लंघन

५० टक्के उपस्थिती शासन आदेशाचे शासकीय कार्यालयांकडून सर्रास उल्लंघन

Next

एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच मार्च एंडिंगच्या पूर्वी निधी खर्च झाला पाहिजे, विविध कामांची बिले तसेच अनेक कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावत आहेत.

शासनाने प्रतिबंधक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती ५० टक्केच ठेवण्याचे दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. यामध्ये विशेष करून महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी, वन, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर परिषद प्रशासन यांच्यासह पोलीस विभागातदेखील ५० टक्केपेक्षा अधिक कर्मचारी दिसून येत आहेत. असे असताना कोरोना संसर्ग कसा नियंत्रित होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासनाने फक्त शासकीय कार्यालयात नव्हे तर एसटी महामंडळातदेखील ५० टक्के उपस्थितीचा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार केल्यास विविध कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ राज्य शासनाच्या ५० टक्के उपस्थितीच्या आदेशाचे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी असलेल्या जिल्हा सीमांवर जिल्हा प्रशासनाने बॅरिकेट्स लावले आहेत. मात्र येथेही म्हणावी तशी तपासणी होत नसल्याने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. यासोबतच नागरिकांनीही मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग राखून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. एकंदरीत सर्वांनी एकत्रित येऊन या कोरोना संकटाचा सामना केल्याशिवाय भविष्यात सर्वसामान्यांना चांगले दिवस येणार नाहीत. यासाठी नागरिक आणि जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांच्या टाईम टेबलकडेच वरिष्ठांचे दुर्लक्ष

राज्य शासनाने मार्च एंडिंग असल्याने कामे कुठेही थांबणार नाहीत. यासोबतच दुसरीकडे कोरोना संसर्ग सोपविण्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांनी कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राखून कोणत्या कर्मचा-याला कधी बोलवायचे, यासोबतच नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी एक निश्चित टाईम टेबल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अनेक कार्यालयांमध्ये कुठेही या सूचनेप्रमाणे वेळापत्रक तयार केलेले दिसून येत नाही. इतकेच नव्हे, तर एकाच वेळी अनेक कर्मचारी कार्यालयांत येत आहेत. दुसरीकडे काही कर्मचारी नागरिकांना कोरोनाचे कारण सांगून कामाची टाळाटाळ करीत आहेत.

बॉक्स

बॅंकातील गर्दी ठरू शकते धोकादायक

गत आठवड्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा संप झाल्याने बँकेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे या आठवड्यात अनेक जण आपले बँकेतील कामकाज करण्यासाठी बँकेत रांगा लावत आहेत. मात्र अनेक बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे. यामध्ये बँकांनी ग्राहकांना मोफत सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय गर्दी होणार नाही, फिजिकल डिस्टन्सिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करून ग्राहकांचीही कामे कुठे अडणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र अनेक बँकांमध्ये मात्र कोरोनाचे नियम दाखवले जातात मात्र ग्राहकांना बँकेतील कामासाठी वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत, हेही वास्तव चित्र दिसून येत आहे.

Web Title: 50% attendance Violation of government order by government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.